Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 52

65 Mantra
15/52
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒यम॒ग्निर्वी॒रत॑मो वयो॒धाः स॑ह॒स्रियो॑ द्योतता॒मप्र॑युच्छन्। वि॒भ्राज॑मानः सरि॒रस्य॒ मध्य॒ऽउप॒ प्र या॑हि दि॒व्यानि॒ धाम॑॥५२॥

अ॒यम्। अ॒ग्निः। वी॒रत॑म॒ इति॑ वी॒रऽत॑मः। व॒यो॒धा इति॑ वयः॒ऽधाः। स॒ह॒स्रियः॑। द्यो॒त॒ता॒म्। अप्र॑युच्छ॒न्नित्यप्र॑ऽयुच्छन्। वि॒भ्राज॑मान॒ इति॑ वि॒ऽभ्राज॑मानः। स॒रि॒रस्य॑। मध्ये॑। उप॑। प्र। या॒हि॒। दि॒व्यानि॑। धाम॑ ॥५२ ॥

Mantra without Swara
अयमग्निर्वीरतमो वयोधाः सहस्रियो द्योततामप्रयुच्छन् । विभ्राजमानः सरिरस्य मध्यऽउपप्रयाहि दिव्यानि धाम ॥

अयम्। अग्निः। वीरतम इति वीरऽतमः। वयोधा इति वयःऽधाः। सहस्रियः। द्योतताम्। अप्रयुच्छन्नित्यप्रऽयुच्छन्। विभ्राजमान इति विऽभ्राजमानः। सरिरस्य। मध्ये। उप। प्र। याहि। दिव्यानि। धाम॥५२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अयम्) हा (सेनापती) (वीरतम:) आपल्या अपरिमित शक्तीने शत्रूंना स्तब्ध व भयभीत करणारा असून (वयोद्या:) सर्वांच्या जीवनाचा आधार आहे. (सहस्रिय:) सहस्र शत्रुसैनिकांएवढा एकटाच किंवा त्याहून अधिक बलवान असून (सरिरस्य) आकाशा(मध्ये) मध्ये (विभ्राजमान:) प्रकाशमान अथवा विद्या आणि न्यायाचरणामुळे कीर्तिमान आहे. हा सेनापती (अप्रयुच्छन्) कधीच प्रमाण करीत नाही (अग्नि अग्नीप्रमाणे याने (द्योतताम्) तेजस्वी व्हावे आणि (दिव्यानि) चांगले (धाम) स्थानावर आरुढ व्हावे, उत्तम कर्म आणि उत्तमपद प्राप्त करीत (या सेनापतीने आम्हा धार्मिकजनांना) (उप, प्र, याहि) प्राप्त व्हावे. (धर्मात्माजनांना सुरक्षा, शांती व निर्भयता मिळावी, सेनापतीने अशी व्यवस्था केली पाहिजे) ॥52॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी नेहमी धर्मात्माजनांच्या सहवासात राहावे आणि प्रमादाचा त्याग करून जितेंद्रियतेमुळे आपले आयुष्य वाढवावे. अशाप्रकारे विद्या आणि धर्म यांचे अनुष्ठानाद्वारे पवित्र व्हावे आणि परोपकार करत असावे ॥52॥
Subject
समाजातील इतर जनांनी धर्मात्मा लोकांप्रमाणे वागावे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे-