Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 47

65 Mantra
15/47
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- विराड् ब्राह्मी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒ग्नि होता॑रं मन्ये॒ दास्व॑न्तं॒ वसु॑ꣳ सू॒नुꣳ सह॑सो जा॒तवे॑दसं॒ विप्रं॒ न जा॒तवे॑दसम्। यऽऊ॒र्ध्वया॑ स्वध्व॒रो दे॒वो दे॒वाच्या॑ कृ॒पा। घृ॒तस्य॒ विभ्रा॑ष्टि॒मनु॑ वष्टि शो॒चिषा॒ऽऽजुह्वा॑नस्य स॒र्पिषः॑॥४७॥

अ॒ग्निम्। होता॑रम्। म॒न्ये॒। दास्व॑न्तम्। वसु॑म्। सू॒नुम्। सह॑सः। जा॒तवे॑दस॒मिति॑ जा॒तऽवे॑दसम्। विप्र॑म्। न। जा॒तऽवे॑दस॒मिति॑ जा॒तऽवे॑दसम्। यः। ऊ॒र्ध्वया॑। स्व॒ध्व॒र इति॑ सुऽअध्व॒रः। दे॒वः। दे॒वाच्या॑। कृ॒पा। घृ॒तस्य॑। विभ्रा॑ष्टि॒मिति॒ विऽभ्रा॑ष्टिम्। अनु॑। व॒ष्टि॒। शो॒चिषा॑। आ॒जुह्वा॑न॒स्येत्या॒ऽजुह्वा॑नस्य। स॒र्पिषः॑ ॥४७ ॥

Mantra without Swara
अग्निँ होतारम्मन्ये दास्वन्तँवसुँ सूनुँ सहसो जातवेदसँविप्रन्न जातवेदसम् । यऽऊर्ध्वया स्वध्वरो देवो देवाच्या कृपा । घृतस्य विभ्राष्टिमनु वष्टि शोचिषाजुह्वानस्य सर्पिषः ॥

अग्निम्। होतारम्। मन्ये। दास्वन्तम्। वसुम्। सूनुम्। सहसः। जातवेदसमिति जातऽवेदसम्। विप्रम्। न। जातऽवेदसमिति जातऽवेदसम्। यः। ऊर्ध्वया। स्वध्वर इति सुऽअध्वरः। देवः। देवाच्या। कृपा। घृतस्य। विभ्राष्टिमिति विऽभ्राष्टिम्। अनु। वष्टि। शोचिषा। आजुह्वानस्येत्याऽजुह्वानस्य। सर्पिषः॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (य:) हा जो (देव:) दिव्य गुणवान असा मनुष्य (अर्ध्वया) ऊर्ध्वगतीने जाणारा (स्वध्वर:) यज्ञ करीत आहे, त्याचे ते कर्म (स्वध्वर:) शुभ कर्म असून अहिंसनीय आहे (याकर्मात हिंसा वर्ज्य आहे) हा यज्ञ (देवाच्या) विद्वज्जनांच्या सत्कारासाठी असून (कृपा) योग्य त्या रीतीने केला जात आहे. यामध्ये (शोचिषा) दीप्ती असून (आजुह्वानस्य) यात हवन केलेल्या (सर्पिष:) घृतामुळे व (घृतस्य) जलाच्या संबंधामुळे (विभ्राष्टिम्) विविध प्रकारच्या ज्योती (अनुवृष्टि) प्रकाशित होत आहेत (वा हा याज्ञिक ज्योती उत्पन्न करीत आहे) हा अग्नी (होतारम्) सुखदाता आणि (जातेवदसम्) सर्व उत्पन्न पदार्थांमधे विद्यमान असणारा आहे. (सहस:) बलशाली पुरुषाच्या (सूनुम्) पुत्राप्रमाणे (वसुम्) धनदाता आणि (दास्वन्तम्) दानशील (जातवेदसम्) असून बुद्धिमंतामधे सर्वाधिक विख्यात (अग्निम्) तेजस्वी (न) अग्नीप्रमाणे असणार्‍या त्या (विप्रम्) आप्त ज्ञानी मनुष्याला मी (एक विद्वान) (मन्ये) मान्य करतो वा त्याचा सत्कार करतो. तुम्ही इतरजनांनी देखील त्या अतीव विद्यावान मनुष्याला तसे मानावे (त्याचा आदर-सत्कार करा) ॥47॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. ज्याप्रमाणे योग्य मान-आदर देऊन विद्वानाकडे गेल्यास ते विद्वज्जन विद्या, धर्म आणि सुशिक्षा देऊन सर्वांना आर्य (श्रेष्ठ) करतात, त्याप्रमाणेच योग्य त्या रीतीने उपयोगात आणल्यास अग्नीदेखील आपल्या गुण, कर्म, स्वभावाने सर्वांचे कल्याण करतो. ॥47॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय वर्णित आहे -