Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 46

65 Mantra
15/46
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- भुरिगार्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
ए॒भिर्नो॑ऽअ॒र्कैर्भवा॑ नोऽअ॒र्वाङ् स्व॒र्ण ज्योतिः॑। अग्ने॒ विश्वे॑भिः सु॒मना॒ऽअनी॑कैः॥४६॥

ए॒भिः। नः॒। अ॒र्कैः। भव॑। नः॒। अ॒र्वाङ्। स्वः॑। न। ज्योतिः॑। अग्ने॑। विश्वेभिः। सु॒मना॒ इति॑ सु॒ऽमनाः॑। अनी॑कैः ॥४६ ॥

Mantra without Swara
एभिर्नाऽअर्कैर्भवा नोऽअर्वाङ्स्वर्ण ज्योतिः । अग्ने विश्वेभिः सुमनाऽअनीकैः ॥

एभिः। नः। अर्कैः। भव। नः। अर्वाङ्। स्वः। न। ज्योतिः। अग्ने। विश्वेभिः। सुमना इति सुऽमनाः। अनीकैः॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्येच्या प्रकाशाने ज्योतिष्मान् असलेल्या विद्वान महोदय, आपण (न:) आमच्यासाठी (सुखकारक व्हा) ज्याप्रमाणे (विश्वेभि:) संपूर्ण (अनीकै:) सैनिकांसाठी राजा (सुमना:) खर्‍या मनाने सुखकारक असतो, तद्वत आपण आम्हां (सामान्य-जनांसाठी) सुखकारक (भव) व्हा. (एभि:) या पूर्व वर्णित (अर्कै:) पूजनीय विद्वानांसह (न:) आमच्याकरिता (ज्योति:) ज्ञानाचा प्रकाश करणारे आणि (अर्वाड्) अधमजनांमा उत्तम करण्याची रीती जाणणारे सर्वजण देखील आमच्यासाठी (स्च:) (न) सुखाप्रमाणे व्हावेत. ॥46॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा तसेच वाचकलुप्तोपमा, हे दोन अलंकार आहेत. ज्याप्रमाणे एखादा राजा प्रशिक्षित आणि शक्तीशाली सैन्याच्या साहाय्याने शत्रूंवर विजय मिळवून आनंदित होतो, तद्वत माणसांनी बुद्धी आदी सद्गुणांद्वारे अविद्येमुळे उत्पन्न होणार्‍या दु:खांवर विजय मिळवून सुखी होऊ शकतात (वा सुखी व्हावे) ॥46॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय प्रतिपादित आहे -