Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 42

65 Mantra
15/42
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- आर्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
सोऽअ॒ग्निर्यो वसु॑र्गृ॒णे सं यमा॒य॑न्ति धे॒नवः॑। समर्व॑न्तो रघु॒द्रुवः॒ सꣳसु॑जा॒तासः॑ सू॒रय॒ऽइष॑ꣳ स्तो॒तृभ्य॒ऽआ भ॑र॥४२॥

सः। अ॒ग्निः। यः। वसुः॑। गृ॒णे। सम्। यम्। आ॒यन्तीत्या॒ऽयन्ति॑। धे॒नवः॑। सम्। अर्व॑न्तः। र॒घु॒द्रुव॒ इति॑ रघु॒ऽद्रुवः॑। सम्। सु॒जा॒तास॒ इति॑ सुऽजा॒तासः॑। सू॒रयः॑। इष॑म्। स्तो॒तृभ्य॒ इति॑ स्तो॒तृभ्यः॑। आ। भ॒र॒ ॥४२ ॥

Mantra without Swara
सोऽअग्निर्या वसुर्गृणे सँयमायन्ति धेनवः । समर्वन्तो रघुद्रुवः सँ सुजातासः सूरयऽइषँ स्तोतृभ्यऽआ भर ॥

सः। अग्निः। यः। वसुः। गृणे। सम्। यम्। आयन्तीत्याऽयन्ित। धेनवः। सम्। अर्वन्तः। रघुद्रुव इति रघुऽद्रुवः। सम्। सुजातास इति सुऽजातासः। सूरयः। इषम्। स्तोतृभ्य इति स्तोतृभ्यः। आ। भर॥४२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्यार्थी, ज्याप्रमाणे मी (तुझा अध्यापक) (य:) ज्या (वसु:) निवासाचे कारण असलेल्या (घराच्या आणि ग्रामादींच्या निर्मितीत साहाय्यभूत असणार्‍या (अग्नि:) अग्नीची (गृणे) चांगल्याप्रकारे स्तुती करतो (त्याचे गुण विशद करतो) (त्याप्रकारे तू देखील कर) ज्याप्रमाणे (यम्) ज्याला (धनेव:) वाणी (समायन्ति) उत्तमप्रकारे प्राप्त होतात (जो वाणी आणि ज्ञानाचा स्वामी आहे) अशा (रघुद्रुव:) धैर्याने वागणार्‍या (अर्वन्त:) उत्तम ज्ञानी आणि (सुजातास:) सर्व विद्यांमधे पारंगत असलेल्या मनुष्याकडून (सूरम:) इतर विद्वान लोक (स्तोतृभ्य:) ज्ञानार्थी विद्यार्थ्यांकरिता (इषम्) ते ज्ञान (सम्) सम्यकप्रकारे धारण करतात (ते ज्ञान विद्यार्थ्याला देतात) तसेच (स:) तो अध्यापक ईश्वर आदी पदार्थांचे गुणवर्णन करून शिष्याला शिकवितो, त्याप्रमाणे तू देखील त्या पूर्वोक्तज्ञानी अध्यापकांपासून (समाभर) ज्ञान ग्रहण करीत जा. ॥42॥
Essence
भावार्थ - अध्यापकांचे कर्तव्य आहे की जसै गौ आपल्यां वासरांना तृप्त करते, तद्वत अध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांना संतुष्ट करावे (एवढे ज्ञान द्यावे की शिष्य तृप्त होतील) तसेच ज्याप्रमाणे घोडा आपल्या स्वाराला शीघ्रच गंतन्य स्थानाला नेतो, तद्वत अध्यापकाने आपल्या विद्यार्थ्यांना विद्या-सागराच्या पैलतीरास नेले पाहिजे ॥42॥
Subject
पुनश्च, अध्यापक कसा असावा, याविषयी -