Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 41

65 Mantra
15/41
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृत्पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अ॒ग्निं तं म॑न्ये॒ यो वसु॒रस्तं॒ यं य॑न्ति धे॒नवः॑। अस्त॒मर्व॑न्तऽआ॒शवोऽस्तं॒ नित्या॑सो वा॒जिन॒ऽइष॑ꣳस्तो॒तृभ्य॒ऽआ भ॑र॥४१॥

अ॒ग्निम्। तम्। म॒न्ये॒। यः। वसुः॑। अस्त॑म्। यम्। यन्ति॑। धे॒नवः॑। अस्त॑म्। अर्व॑न्तः। आ॒शवः॑। अस्त॑म्। नित्या॑सः। वा॒जिनः॑। इष॑म्। स्तो॒तृभ्य॒ इति॑ स्तो॒तृऽभ्यः॑। आ। भ॒र॒ ॥४१ ॥

Mantra without Swara
अग्निन्तम्मन्ये यो वसुरस्तँयँयन्ति धेनवः । अस्तमर्वन्त आशवो स्तन्नित्यासो वाजिन इष स्तोतृभ्यऽआ भर ॥

अग्निम्। तम्। मन्ये। यः। वसुः। अस्तम्। यम्। यन्ित। धेनवः। अस्तम्। अर्वन्तः। आशवः। अस्तम्। नित्यासः। वाजिनः। इषम्। स्तोतृभ्य इति स्तोतृऽभ्यः। आ। भर॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अध्यापक विद्यार्थ्याप्रत) हे विद्यार्थी शिष्या, (य:) जो (वसु:) सर्वत्र राहणारा (असणारा) अग्नी आहे, त्यास मी मानतो, योग्य ते महत्त्व देतो) ज्याप्रमाणे (धेनव:) गायी (अस्तम्) आपल्या घराकडे (यन्ति) जातात आणि (नित्यास:) कारणारूपाने अविनाशी असलेले (वाजिन:) वेगवान् (आशव:) अति वेगवान (अर्वन्त:) घोडे (अस्तम्) आपल्या घराकडे जातात, (तेवढ्या वेगाने वा तीव्रतेने) मी (तम्) त्या अग्नीला (मन्ये) महत्त्व देतो (यम्) ज्या (अग्निम्) अग्नीला (गायी आणि घोडीं आपल्या घराकडे जाण्यासाठी आतुर असतात, तेवढ्या आतुरतेने मी अग्नीकडे जातो, म्हणजे त्यास महत्त्वपूर्ण मानतो. तसेच (स्तोतृभ्य:) स्तुतिकारक विद्वानांसाठी मी (इषम्) अन्न आदी आवश्यक पदार्थ धारण करतो (विद्वानांसाठी मी (इषम्) अन्न आदी आवश्यक पदार्थ धारण करतो (विद्वानांच्या निवास भोजनादीची व्यवस्था करतो) त्याप्रमाणे, हे शिष्या, तू देखील त्या अग्नीला (आभर) धारण कर (त्याचे उचित उपयोग जाणून घे) ॥41॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. अध्यापकजनांनी आपल्या विद्यार्थ्यांना असे सांगितले पाहिजे की आम्ही तुमचे अध्यापक ज्याप्रमाणे आचरण करू, तुम्ही देखील तसेच श्रेष्ठ आचरण करीत जा. जसे गौ आदी पाळीव पशू दिवसा इकडे-तिकडे फिरून सायंकाळी त्यांच्या घरी येतात आणि आनंदित होतात, तसे तुम्ही विद्यार्थ्यांनी देखील विद्यालयाकडे (गुरुकुलाकडे) येताना आनंदित व्हायला पाहिजे ॥41॥
Subject
पुनश्च, त्या विद्वानांनी काय करावे, याविषयी-