Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 37

65 Mantra
15/37
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
क्ष॒पो रा॑जन्नु॒त त्मनाग्ने॒ वस्तो॑रु॒तोषसः॑। स ति॑ग्मजम्भ र॒क्षसो॑ दह॒ प्रति॑॥३७॥

क्ष॒पः। रा॒ज॒न्। उ॒त। त्मना॑। अग्ने॑। वस्तोः॑। उ॒त। उ॒षसः॑। सः। ति॒ग्म॒ज॒म्भेति॑ तिग्मऽजम्भ। र॒क्षसः॑। द॒ह॒। प्रति॑ ॥३७ ॥

Mantra without Swara
क्षपो राजन्नुत त्मनाग्ने वस्तोरुतोषसः । स तिग्मजम्भ रक्षसो दह प्रति ॥

क्षपः। राजन्। उत। त्मना। अग्ने। वस्तोः। उत। उषसः। सः। तिग्मजम्भेति तिग्मऽजम्भ। रक्षसः। दह। प्रति॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (तिग्मजम्भ:) तीक्ष्ण अस्त्रशस्त्रांचे संचालन करणारे वा शस्त्रांनी युद्ध करणारे (राजन्) कीर्तिमान राजा आणि (अग्ने) हे विद्वान, (स:) पूर्वी वर्णित केलेला (गुण, कर्म, स्वभाव असलेला तेजोमय अग्नी) (क्षप:) रात्र (उत) आणि वस्ते:) दिवस (उत) आणि (वस्तेव:) दिवस (उत) आणि (उषस:) प्रभातकाळ व संध्याकाळ उत्पन्न करतो (अग्नीच्या सूर्य, विद्युत भौतिक आग या रुपांनी प्रकाश आणि दिवस-रात्र होतात). त्याप्रमाणे आपण (त्मना) आपल्या प्रभावी व तेजस्वी आत्मशक्तीद्वारे (रक्षस:) अग्नी जसा रात्रीच्या अंधकाराला, तसे आपण समाजातील दुष्ट माणसांना (प्रतिदह) अवश्यमेव भस्म करून टाका ॥37॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे प्रभातकाळ, दिवस आणि रात्र यांचे कारण अग्नी आहे, त्याप्रमाणे राजा न्यायरूप प्रकाशाद्वारे अन्यायरुप रात्रीच्या अंधकाराला दूर करीत असतो. सर्व मनुष्यांनी हे तथ्य नीट जाणून घ्यावे ॥37॥
Subject
पुनश्च, तो अग्नी कसा आहे, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -