Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 36

65 Mantra
15/36
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
सऽइ॑धा॒नो वसु॑ष्क॒विर॒ग्निरी॒डेन्यो॑ गि॒रा। रे॒वद॒स्मभ्यं॑ पुर्वणीक दीदिहि॥३६॥

सः। इ॒धा॒नः। वसुः॑। क॒विः। अ॒ग्निः। ई॒डेन्यः॑। गि॒रा। रे॒वत्। अ॒स्मभ्य॑म्। पु॒र्व॒णी॒क॒। पु॒र्वनी॒केति॑ पुरुऽअनीक। दी॒दि॒हि॒ ॥३६ ॥

Mantra without Swara
सऽइधानो वसुष्कविरग्निरीडेन्यो गिरा । रेवदस्मभ्यम्पुर्वणीक दीदिहि ॥

सः। इधानः। वसुः। कविः। अग्निः। ईडेन्यः। गिरा। रेवत्। अस्मभ्यम्। पुर्वणीक। पुर्वनीकेति पुरुऽअनीक। दीदिहि॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (पुर्वणीक) विशाल सैन्याची अधिपती असलेल्या राजपुरुष (सेनापती) आणि हे विद्वान, हा अग्नी (की ज्याचे गुण, कर्म, स्वभाव) (गिरा) वाणी वा उपदेशाद्वारे (ईडेन्य:) विशद करता येतात, जो (वसु:) (गृह आदीं निवासासाठी उपयोगी असून) आम्हाला बसविणारा आहे, जो (कवि:) सामर्थ्यशाली आहे. (इधान:) प्रयीत केल्यानंतर (स:) तो पूर्वोक्त (अग्नि:) अग्नी (अस्मभ्यम्) आमच्यासाठी (रेवत्) प्रशंसनीय आणि वांछित धर्म आदी पदार्थ देणारा असेल, अशाप्रकारे त्या अग्नीला (दीदिहि) आपण प्रकाशित करा (आम्हा सर्व प्रजाजनांसाठी हा अग्नी कसा अधिकाधिक उपयोगी होईल, याविषयी शोधकार्य करा) ॥36॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. विद्वान, वैज्ञानिक आदींचे कर्तव्य आहे की त्यांनी अग्नीच्या गुण, कर्म, स्वभाव सर्वजनांसाठी विशद करावेत आणि त्याद्वारे सर्वजनांसाठी ऐश्वर्य निर्माण करावे ॥36॥
Subject
पुनश्च, तो अग्नी (आमच्यासाठी) कसा असावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -