Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 33

65 Mantra
15/33
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृद् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
विश्व॑स्य दू॒तम॒मृतं॒ विश्व॑स्य दू॒तम॒मृत॑म्। स यो॑जतेऽअरु॒षा वि॒श्वभो॑जसा॒ स दु॑द्रव॒त् स्वाहुतः॥३३॥

विश्व॑स्य। दू॒तम्। अ॒मृत॑म्। विश्व॑स्य। दू॒तम्। अ॒मृत॑म्। सः। यो॒ज॒ते॒। अ॒रु॒षा। वि॒श्वभो॑ज॒सेति॑ वि॒श्वऽभो॑जसा। सः। दु॒द्र॒व॒त्। स्वा᳖हुत॒ इति॒ सुऽआ॑हुतः ॥३३ ॥

Mantra without Swara
विश्वस्य दूतममृतँविश्वस्य दूतममृतम् । स योजतेऽअरुषा विश्वभोजसा स दुद्रवत्स्वाहुतः ॥

विश्वस्य। दूतम्। अमृतम्। विश्वस्य। दूतम्। अमृतम्। सः। योजते। अरुषा। विश्वभोजसेति विश्वऽभोजसा। सः। दूद्रुवत्। स्वाहुत इति सुऽआहुतः॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वान वैज्ञानिक म्हणतो) हे लोकहो, ज्याप्रमाणे मी (विश्वस्य) सर्व भूगोलसमूहाचा (दूतम्) दूत असलेल्या भूगोलाला उष्णता देणार्‍या सूर्याप्रमाणे असलेल्या (अमृतम्) कारणरुपाने अविनाशी असलेल्या अग्नीचा स्वीकार करतो (उपयोग करतो, त्या अग्नीला तुम्ही देखील पूर्णपणे जाणले पाहिजे) तसेच (विश्वास) संपूर्ण पदार्थांना आपल्या (दूतम्) उष्णता वा ज्वलनशीलतेमुळे जाळून टाकणार्‍या आणि (अमृतम्) कारणरुपाने आणि व्यापकत्व गुणाने पाण्यातदेखील सदैव असणार्‍या अग्नीचा मी स्वीकार करतो. तो (विश्वमोजसा) जगाचा रक्षक असून (अरूषा) सर्व पदार्थांमधे विद्यमान आहे. (स:) तो अग्नी (योजने) पदार्थांना जोडतो. (स्वाहुत:) योग्य पद्धतीने वापरल्यास हितकारी होत असून (दुद्रवत्) शरीरादींमध्ये देखील संचार करतो (स:) अशा त्या अग्नीला तुम्ही सर्वांनी जाणले पाहिजे (त्याची उपयुक्तता ओळखली पाहिजे) ॥33॥
Essence
भावार्थ - या मंत्रात (अर्थपूर्तीसाठी) पूर्वीच्या मंत्रातील ‘आहुवे’ या शब्दाची अनुवृत्ती केली आहे. तसेच ‘विश्वस्थ दूममृतम्’ या तीन शब्दांची दोनदा आवृत्ती केली आहे. प्रथम प्रयोगाद्वारे ‘स्थूल अग्नीं’ हा अर्थ अभिप्रेत आहे आणि दुसरा प्रयोगाद्वारे ‘सूक्ष्म अग्नी’ या अर्थाचे ग्रहण केले आहे. अग्नीचे हे दोन्ही रुप कारणरुपाने नित्य आहेत, असे जाणावे. ॥33॥
Subject
पुनश्च, तो अग्नी कसा आहे, याविषयी -