Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 32

65 Mantra
15/32
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- विराड् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
ए॒ना वो॑ऽअ॒ग्निं नम॑सो॒र्जो नपा॑त॒माहु॑वे। प्रि॒यं चेति॑ष्ठमर॒तिꣳस्व॑ध्व॒रं विश्व॑स्य दू॒तम॒मृत॑म्॥३२॥

ए॒ना। वः॒। अ॒ग्निम्। नम॑सा। ऊ॒र्जः। नपा॑तम्। आ। हु॒वे॒। प्रि॒यम्। चेति॑ष्ठम्। अ॒र॒तिम्। स्व॒ध्व॒रमिति॑ सुऽअ॒ध्व॒रम्। विश्व॑स्य। दू॒तम्। अ॒मृत॑म् ॥३२ ॥

Mantra without Swara
एना वोऽअग्निन्नमसोर्जा नपातमा हुवे । प्रियञ्चेतिष्ठमरतिँ स्वध्वरँ विश्वस्य दूतममृतम् ॥

एना। वः। अग्निम्। नमसा। ऊर्जः। नपातम्। आ। हुवे। प्रियम्। चेतिष्ठम्। अरतिम्। स्वध्वरमिति सुऽअध्वरम्। विश्वस्य। दूतम्। अमृतम्॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे मी (एक विद्वान वैज्ञानिक) (व:) तुमच्यासाठी (एना) त्यापूर्वी सांगितलेल्या (नमसा) ग्रहणीय अन्न आदी पदार्थांद्वारे (नयातम्) दृढ स्वभावाच्या (निश्चित गुणधर्म असलेल्या) आणि (प्रियम्) सर्वांना प्रिय वाढणार्‍या अग्नीला (उपयोगात आणतो, तसे तुम्ही देखील करा) कारण हा अग्नी विद्युत रुपाने (चेतिष्ठम्) चेतना वा शक्ती देणारा आहे (अरतिम्) चैतन्यरहित असूनही (स्वध्वरम्) चांगल्या कार्यासाठी साहाय्यभूत होतो, (अमृतम्) कारणरूपाने नित्य आहे आणि (विश्वस्य) संपूर्ण जगामधे (दूतम्) दूत म्हणून जातो (विद्युत ताराद्वारे तसेच दूरवर्ती स्थानात संदेशवाहक म्हणून, दूरभाष, दूर) (अग्निम्) त्या अग्नीला आणि (ऊर्ज:) त्यापासून मिळणार्‍या शक्ती आदी कार्याला (आहुवे) उपयोगात आणतो. (म्हणून एक वैज्ञानिक ज्याप्रमाणे उपयोगात आणतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील करा) ॥32॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, आम्ही (वैज्ञानिक लोक) तुमच्याकरिता ज्या अग्नि आदी विद्येचे प्रकटन व ज्ञानप्राप्ती केली आहे, तुम्ही त्या ज्ञानाचा लाभ घ्या. ॥32॥
Subject
तो अग्नी कसा आहे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे-