Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 31

65 Mantra
15/31
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
त्वां चि॑त्रश्रवस्तम॒ हव॑न्ते वि॒क्षु ज॒न्तवः॑। शो॒चिष्के॑शं पुरुप्रि॒याग्ने॑ ह॒व्याय॒ वोढ॑वे॥३१॥

त्वाम्। चि॒त्र॒श्र॒व॒स्त॒मेति॑ चित्रश्रवःऽतम। हव॑न्ते। वि॒क्षु। ज॒न्तवः॑। शो॒चिष्के॑शम्। शो॒चिःके॑श॒मिति॑ शो॒चिःऽके॑शम्। पु॒रु॒प्रि॒येति॑ पुरुऽप्रिय। अग्ने॑। ह॒व्याय॑। वोढ॑वे ॥३१ ॥

Mantra without Swara
त्वाञ्चित्रश्रवस्तम हवन्ते विक्षु जन्तवः । शोचिष्केशम्पुरुप्रियाग्ने हव्याय वोढवे ॥

त्वाम्। चित्रश्रवस्तमेति चित्रश्रवःऽतम। हवन्ते। विक्षु। जन्तवः। शोचिष्केशम्। शोचिःकेशमिति शोचिःऽकेशम्। पुरुप्रियेति पुरुऽप्रिय। अग्ने। हव्याय। वोढवे॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पुरुप्रिय) अनेकांना आनंद देणारे अथवा अनेकांना प्रिय असणारे आणि (चित्रश्रवस्तम) आश्चर्यरुप आदी पदार्थांनी समृद्ध असणारे (अग्ने) हे विद्वान, (विबु) प्रजाजनांसाठी (हव्याय) वांछित वा प्रिय अन्न आदी पदार्थांच्या (वोढवे) प्राप्तीसाठी (शोचिष्केशम्) शोषण करणार्‍या सूर्यकिरणांप्रमाणे तेजस्वी असलेल्या (त्वाम्) आपल्या ज्याप्रमाणे (जन्तव:) सामाजिक जन (हवन्ते) स्वीकार करतात, त्याप्रमाणे आम्ही इतर सर्वजण देखील आपला स्वीकार करतो. ॥31॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हे हितकर आहे की ज्या अग्नीचे सर्व प्राणी सेवन करतात (त्यापासून उपभोग घेतात) त्या अग्नीपासून भारवहम, (प्रवास आदी कार्यदेखील) संपन्न करावेत (अग्नीरुप विद्युत, वाष्प आदी ऊर्जाच्या साहाय्याने सामानाची ने-आण, दूरचा प्रवास आदी लाभ घ्यावेत.) ॥31॥
Subject
मनुष्यांनी अग्नीपासून कोणकोणती कार्यें सिद्ध करावी, पुढील मंत्रात हा विषय वर्णित आहे-