Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 27

65 Mantra
15/27
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदार्षी जगती Swara- निषादः
Mantra with Swara
जन॑स्य गो॒पाऽअ॑जनिष्ट॒ जागृ॑विर॒ग्निः सु॒दक्षः॑ सुवि॒ताय॒ नव्य॑से। घृ॒तप्र॑तीको बृह॒ता दि॑वि॒स्पृशा॑ द्यु॒मद्विभा॑ति भर॒तेभ्यः॒ शुचिः॑॥२७॥

जन॑स्य। गो॒पाः। अ॒ज॒नि॒ष्ट॒। जागृ॑विः। अ॒ग्निः। सु॒दक्ष॒ इति॑ सु॒ऽदक्षः॑। सु॒वि॒ताय॑। नव्य॑से। घृ॒तप्र॑तीक॒ इति॑ घृ॒तऽप्र॑तीकः। बृ॒ह॒ता। दि॒वि॒स्पृशेति॑ दिवि॒ऽस्पृशा॑। द्यु॒मदिति॑ द्यु॒ऽमत्। वि। भा॒ति॒। भ॒र॒तेभ्यः॑। शुचिः॑ ॥२७ ॥

Mantra without Swara
जनस्य गोपाऽअजनिष्ट जागृविरग्निः सुदक्षः सुविताय नव्यसे । घृतप्रतीको बृहता दिविस्पृशा द्युमद्वि भाति भरतेभ्यः शुचिः ॥

जनस्य। गोपाः। अजनिष्ट। जागृविः। अग्निः। सुदक्ष इति सुऽदक्षः। सुविताय। नव्यसे। घृतप्रतीक इति घृतऽप्रतीकः। बृहता। दिविस्पृशेति दिविऽस्पृशा। द्युमदिति द्युऽमत्। वि। भाति। भरतेभ्यः। शुचिः॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, हा (अग्नी) (जनस्य) या उत्पन्न जगाचा (गोपा:) रक्षक असूम (जागृवि:) सदा निरंतर जागृत (ज्वलन व प्रकाशन गुणांनीयुक्त) असो, तो (सुदक्ष:) वांछित बल (ऊर्जा) देणारा असून (घृतप्रतिक:) घृताहुतीने वृद्धी पावणारा आहे (शुचि:) पवित्र आहे. असा हा (अग्नि:) अग्नी विद्युत आदी रुपात (नव्यसे) नवनवीन हेतूसाठी आणि (सुविताय) ऐश्वर्य-समृद्धीच्या प्राप्तीसाठी (अजनिष्ट) या जगात प्रकट झालेला आहे. तसेच (बृहता) विशाल (द्विविस्पृशा) आकाशात (भरतेभ्य:) (घुमत्) प्रकाशित होऊन सर्व ठिकाणी (विभागति) शोभित होत आहे, अशा अग्नीला (त्याच्या विविध रुपाला) तुम्ही लोक जाणून घ्या (आणि त्यापासून लाभ घ्या) ॥27॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी हे जाणले पाहिजे की अग्नी आणि सृष्टीतील अनेक सूर्यांचे कारण असलेले अग्निचे जे विद्युत रुप तेज आहे, ते सर्व ऐश्वर्यप्राप्तीचे मुख्य व विशेष कारण आहे. शोध, प्रयोग, उपयोग आदीद्वारा त्या विद्युतशक्तीपासून अवश्य उपकृत व्हावे. ॥27॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय वर्णित आहे -