Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 24

65 Mantra
15/24
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अबो॑ध्य॒ग्निः स॒मिधा॒ जना॑नां॒ प्रति॑ धे॒नुमिवाय॒तीमु॒षास॑म्। य॒ह्वाऽइ॑व॒ प्र व॒यामु॒ज्जिहा॑नाः॒ प्र भा॒नवः॑ सिस्रते॒ नाक॒मच्छ॑॥२४॥

अबो॑धि। अ॒ग्निः। स॒मिधेति॑ स॒म्ऽइधा॑। जना॑नाम्। प्रति॑। धे॒नुमि॒वेति॑ धे॒नुम्ऽइ॑व। आ॒य॒तीमित्या॑ऽय॒तीम्। उ॒षास॑म्। उ॒षस॒मित्यु॒षस॑म्। य॒ह्वा इ॒वेति॑ य॒ह्वाःऽइ॑व। प्र। व॒याम्। उ॒ज्जिहा॑ना॒ इत्यु॒त्ऽजिहा॑नाः। प्र। भा॒नवः॑। सि॒स्र॒ते॒। नाक॑म्। अच्छ॑ ॥२४ ॥

Mantra without Swara
अबोध्यग्निः समिधा जनानाम्प्रति धेनुमिवायतीमुषासम् । यह्वाऽइव प्र वयामुज्जिहानाः प्र भानवः सिस्रते नाकमच्छ ॥

अबोधि। अग्निः। समिधेति सम्ऽइधा। जनानाम्। प्रति। धेनुमिवेति धेनुम्ऽइव। आयतीमित्याऽयतीम्। उषासम्। उषसमित्युषसम्। यह्वा इवेति यह्वाःऽइव। प्र। वयाम्। उज्जिहाना इत्युत्ऽजिहानाः। प्र। भानवः। सिस्रते। नाकम्। अच्छ॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, हा (अग्नि:) अग्नी समिधा) प्रज्वलित होणार्‍या काष्ठ आदी साधनांनी (अबोधि) उद्दीप्त होतो आणि प्रकाश देतो. हा अग्नी (आयतीम्) येत असलेल्या (वा उगवत असलेल्या) (उषासम्) प्रभातकाळाप्रमाणे (प्रति) (जनानाम्) माणसांकरिता (धेनुमिव) दूध देणार्‍या गायीप्रमाणे आहे. याच अग्नीचे (प्र) उत्कृष्ट (वयाम्) प्रभूत सुखदायक गुण (यह्वाइव) महान धार्मिक लोकांप्रमाणे आहेत (हा अग्नी धार्मिक उपकारी स्वभावाच्या माणसांप्रमाणे सर्वांना सुखी करणारा आहे) त्या अग्नीला (उज्जिहाना:) प्राप्त करीत (त्याच्यापासून लाभ घेत) (प्र) उत्तम (भानव:) किरणें (वाकम्) सुखाची (अच्छ) चांगल्याप्रकारे (सिस्रते) प्राप्ती करतात. (किरणें अग्नीपासूनच उष्णता ग्रहण करतात) त्या किरणाचा आणि अग्नीचा तुम्ही लोक आपल्या सुखासाठी उपयोग करा ॥24॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे एक गाय दुग्ध आदी पदार्थ देऊन प्राण्यांना सुखी करते आणि जसे आप्त विदजजन विद्यादान करून अविद्येचे निवारण करतात आणि सर्वांची उन्नती करतात, हा अग्नीदेखील गौ आणि विद्वानांप्रमाणे सर्वांना सुखी करणारा आहे, असे सर्वांनी जाणून घ्यावे ॥24॥
Subject
माणसाने कसे असावे (कसे वागावे), पुढील मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे-