Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 23

65 Mantra
15/23
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
भुवो॑ य॒ज्ञस्य॒ रज॑सश्च ने॒ता यत्रा॑ नि॒युद्भिः॒ सच॑से शि॒वाभिः॑। दि॒वि मू॒र्धानं॑ दधिषे स्व॒र्षां जि॒ह्वाम॑ग्ने चकृषे हव्य॒वाह॑म्॥२३॥

भुवः॑। य॒ज्ञस्य॑। रज॑सः। च॒। ने॒ता। यत्र॑। नि॒युद्भि॒रिति॑ नि॒युत्ऽभिः॑। सच॑से। शि॒वाभिः॑। दि॒वि। मू॒र्धा॑नम्। द॒धि॒षे॒। स्व॒र्षाम्। स्वः॒सामिति॑ स्वः॒ऽसाम्। जि॒ह्वाम्। अ॒ग्ने॒। च॒कृ॒षे॒। ह॒व्य॒वाह॒मिति॑ हव्य॒ऽवाह॑म् ॥२३ ॥

Mantra without Swara
भुवो यज्ञस्य रजसश्च नेता यत्रा नियुद्भिः सचसे शिवाभिः । दिवि मूर्धानन्दधिषे स्वर्षाञ्जिह्वामग्ने चकृषे हव्यवाहम् ॥

भुवः। यज्ञस्य। रजसः। च। नेता। यत्र। नियुद्भिरिति नियुत्ऽभिः। सचसे। शिवाभिः। दिवि। मूर्धानम्। दधिषे। स्वर्षाम्। स्वःसामिति स्वःऽसाम्। जिह्वाम्। अग्ने। चकृषे। हव्यवाहमिति हव्यऽवाहम्॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान, ज्याप्रमाणे हा भौतिक अग्नी (नियुद्भि:) (पदार्थांचा) संयोग-वियोग करणारा आहे आणि (शिवाभि:) मंगलकारी दीप्तीने युक्त आहे, तसेच प्रत्यक्ष उत्पन्न (यज्ञस्य) कार्यांची सिद्धी करणारा (च) आणि रजस:) लोक-लोकांतराचा (ग्रह-नक्षत्रादींचा) (नेता) नियंत्रण करणारा ना (योग्य कक्षेत दिशेत आकर्षित करून ठेवणारा) आहे, (त्याप्रमाणे, हे विद्वान, तू देखील (शुभगुणांना व सर्व सद्विद्यांचे आकर्षण कर) तसेच ज्याप्रमाणे हा भौतिक अग्नी) (यंत्र) ज्या आपल्या (दिवि) प्रकाशमान दशेत (मूर्द्धानम्) उत्तमांग म्हणजे शिराप्रमाणे असलेल्या सूर्याला धारण करतो, (हन्यवाहम्) ग्रहणीय व निसर्गातील सेवनीय रसांची प्राप्ती करून देणार्‍या (स्वर्षाम्) सुखदायक (जिह्वाम्) वाणी (चक्षे) बोलण्याकडे सर्वांना प्रवृत्त करतो. (शरीरातील प्राण-अग्नी मनुष्यांना जीवन उत्साह, देऊन कार्यात प्रवृत्त करतो) त्याप्रमाणे हे विद्वान्, तू देखील (सचसे) सर्व सद्गुणांनी युक्त हो आणि सर्व श्रेष्ठ विद्या, विज्ञानादीची (दधिषे) धारण कर (वा अग्नीद्वारे उत्तमोत्तम लाभ घेण्यासाठी ज्ञान-विद्वानाचा आधार घे) ॥23॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे ईश्वराने कार्यात प्रवृत्त केलेला भौतिक अग्नी सर्व जगाला सुखकारी आहे, तद्वत् विद्या-विज्ञानाचे अध्यापक सर्व मनुष्यांकरिता सुखकारी होतात (अग्निविषयी शोध, प्रयोगादीद्वारे सर्व माणसांना लाभान्वित करतात) सर्वांनी या अग्नी आणि वैज्ञानिकांविषयी हे तथ्य समजून घ्यायला हवे) ॥23॥
Subject
पुनश्च, माणसांनी आपली शक्ती कशी वाढवावी, हा विषय पुढील मंत्रात प्रतिपादित आहे-