Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 22

65 Mantra
15/22
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
त्वाम॑ग्ने॒ पुष्क॑रा॒दध्यथ॑र्वा॒ निर॑मन्थत। मू॒र्ध्नो विश्व॑स्य वा॒घतः॑॥२२॥

त्वाम्। अ॒ग्ने॒। पुष्क॑रात्। अधि॑। अथ॑र्वा। निः। अ॒म॒न्थ॒त॒। मू॒र्ध्नः। विश्व॑स्य। वा॒घतः॑ ॥२२ ॥

Mantra without Swara
त्वामग्ने पुष्करादध्यथर्वा निरमन्थत । मूर्ध्ना विश्वस्य वाघतः ॥

त्वाम्। अग्ने। पुष्करात्। अधि। अथर्वा। निः। अमन्थत। मूर्ध्नः। विश्वस्य। वाघतः॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान महोदय, ज्याप्रमाणे (अथर्वा) सर्वांचे रक्षण करणारे (वाद्यत:) उत्तम वाणी (वा उपदेशाद्वारा) अविद्येचा नाश करणारे ज्ञानी मनुष्य (पुष्करात्) अंतरिक्षातच्या (अधि)मध्ये आणि मूर्ध्न:) मस्तकाप्रमाणे श्रेष्ठ असलेल्या (विश्वस्थ) संपूर्ण जगामधे अग्नीला (निरमन्थत) निरंतर मंथन करून ग्रहण करतात( म्हणजे श्रेष्ठ वैज्ञानिकजन ज्याप्रमाणे अंतरिक्षात आणि सर्वत्र विद्यमान असलेल्या विद्युतरुप अग्नीला मंथन करून (जलविद्युत वा जनरेटरद्वारे) त्याचा उपयोग करतात) त्याप्रमाणे (त्वाम्) तुम्ही अन्य विद्वानांनादेखील मी प्रेरित करतो (समाजातील ज्ञानी माणसांनी विद्युत-ऊर्जेचा यथोचित वापर करावा) ॥22॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. विद्वान लोक जसे आकाशातून आणि भूमीपासून विद्युतशक्ती ग्रहण करून आश्चर्यमय कामे सिद्ध करतात, त्याप्रमाणे सर्व माणसांनीदेखील विद्युतऊर्जेपासून अद्भूत लाभ प्राप्त करावेत ॥22॥
Subject
पुढील मंत्रात देखील तोच विषय (माणसाची कर्तव्ये) प्रति पादित आहे-