Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 21

65 Mantra
15/21
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒यम॒ग्निः स॑ह॒स्रिणो॒ वाज॑स्य श॒तिन॒स्पतिः॑। मू॒र्धा क॒वी र॑यी॒णाम्॥२१॥

अ॒यम्। अ॒ग्निः। स॒ह॒स्रिणः॑। वाज॑स्य। श॒तिनः॑। पतिः॑। मू॒र्द्धा। क॒विः। र॒यी॒णाम् ॥२१ ॥

Mantra without Swara
अयमग्निः सहस्रिणो वाजस्य शतिनस्पतिः । मूर्धा कवी रयीणाम् ॥

अयम्। अग्निः। सहस्रिणः। वाजस्य। शतिनः। पतिः। मूर्द्धा। कविः। रयीणाम्॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे (अयम्) हा (अग्नि:) अग्नी हेमंत ऋतूत (सहस्रिण:) प्रशंसनीय अशा असंख्य पदार्थांनी युक्त असतो आणि (शतिंन:) उत्तम गुणांसहित विद्यमान (वाजस्य) अन्न-धान्याचा आणि (रयीणाम्) धनाचा (पति:) रक्षक असतो, आणि जो अग्नी (मूर्द्धा) शरीरातील अंगापैकी उत्तम अंग म्हणजे शिराप्रमाणे (कवि) समर्थ आहे, त्या अग्नीप्रमाणे, हे मनुष्यांनो, तुम्ही देखील व्हा (अग्नीप्रमाणे उत्तम उपकारक गुण धारण करा) ॥21॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे योग्य त्या रीतीने आणि तंत्रविद्यादीद्वारे उपयोगात आणलेला अग्नी प्रभूत अन्न व समृद्धीची प्राप्ती करून देतो, त्याप्रमाणे मनुष्यांनीदेखील जर मनुष्यांनी ज्ञान आणि पुरुषार्थपूर्वक त्या अग्नीचा उपयोग केला, नंतर तो त्यांनाही ऐश्वर्यवान करतो. ॥21॥
Subject
मनुष्याने काय करावे (त्याची कर्तव्ये कोणती) पुढील मंत्रात हा विषय मांडला आहे-