Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 18

65 Mantra
15/18
Devata- शरदृतुर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- भुरिगतिधृतिः Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒यमु॑त्त॒रात् सं॒यद्व॑सु॒स्तस्य॒ तार्क्ष्य॒श्चारि॑ष्टनेमिश्च सेनानीग्राम॒ण्यौ। वि॒श्वाची॑ च घृ॒ताची॑ चाप्स॒रसा॒वापो॑ हे॒तिर्वातः॒ प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽअस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां जम्भे॑ दध्मः॥१८॥

अ॒यम्। उ॒त्त॒रात्। सं॒यद्व॑सु॒रिति॑ सं॒यत्ऽव॑सुः। तस्य॑। तार्क्ष्यः॑। च॒। अरि॑ष्टनेमि॒रित्यरि॑ष्टऽनेमिः। च॒। से॒ना॒नी॒ग्रा॒म॒ण्यौ᳖। से॒ना॒नी॒ग्रा॒म॒न्या᳖विति॑ सेनानीग्राम॒न्यौ᳖। वि॒श्वाची॑। च॒। घृ॒ताची॑। च॒। अ॒प्स॒रसौ॑। आपः॑। हे॑तिः। वातः॑। प्रहे॑ति॒रिति॒ प्रऽहे॑तिः। तेभ्यः॑। नमः॑। अ॒स्तु॒। ते। नः॒। अ॒व॒न्तु॒। ते। नः॒। मृ॒ड॒य॒न्तु॒। ते। यम्। द्वि॒ष्मः। यः। च॒। नः॒। द्वेष्टि॑। तम्। ए॒षा॒म्। जम्भे॑। द॒ध्मः॒ ॥१८ ॥

Mantra without Swara
अयमुत्तरात्सँयद्वसुस्तस्य तार्क्ष्यश्चारिष्टनेमिश्च सेनानीग्रामण्या । विश्वाची च घृताची चाप्सरसावापो हेतिर्वातः प्रहेतिस्तेभ्यो नमोऽअस्तु ते नो वन्तु ते नो मृडयन्तु ते यन्द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तमेषाञ्जम्भे दध्मः ॥

अयम्। उत्तरात्। संयद्वसुरिति संयत्ऽवसुः। तस्य। तार्क्ष्यः। च। अरिष्टनेमिरित्यरिष्टऽनेमिः। च। सेनानीग्रामण्यौ। सेनानीग्रामन्याविति सेनानीग्रामन्यौ। विश्वाची। च। घृताची। च। अप्सरसौ। आपः। हेतिः। वातः। प्रहेतिरिति प्रऽहेतिः। तेभ्यः। नमः। अस्तु। ते। नः। अवन्तु। ते। नः। मृडयन्तु। ते। यम्। द्विष्मः। यः। च। नः। द्वेष्टि। तम्। एषाम्। जम्भे। दध्मः॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अयम्) हा (उत्तरात्) उत्तर दिशेपासून विशेष त्याने येणारा शरद ऋतू आहे, तो (संयद्वसु:) यज्ञाची संगती करणारा (यज्ञ करण्यासाठी विशेषत्वाने अनुकूल) आहे. (तस्य) शरदऋतूचे (दोन महिने आहेत) (सेनानीग्रामण्यौ) सेनापती आणि ग्रामाध्यक्षाप्रमाणे असलेला (तार्क्ष्य:) तीक्ष्ण तेज (तीव्र प्रकाश व उष्मा) देणारा आश्विन मास आहे (शरदऋतूच्या या आश्विन मासात उष्मा व प्रकाश यांची तीव्रता विशेषत्वाने भासते) (च) आणि (अरिष्टनेमि:) दु:खनाशक (शीतत्व देणारा) कार्तिक महिना आहे. (या शरदऋतूत) (च) (या दोन महिन्यात) आणखी (विश्वाची) सर्व जगात व्यापणारी (च) आणि (घृताची) तूप आणि पाणी यांची प्राप्ती करून देणारी दीप्ती (सूर्य व चंद्राचा प्रकाश) (च) आणि या दोन्हीत व्यापणारी (अप्सरसौ) प्राणांची दोन प्रकारची गती असते. (याशिवाय या ऋतूत) (आप:) जलाची (हेति:) वृद्धी होते व उपयोग होतो आणि (वाता) प्रिय पवन (प्रहेति:) विशेषत्वाने वृद्धिकारक व आनंददायक असतो. या शारदीय वायूचे जे लोक सेवन करतात, (तेभ्य:) त्यांच्यासाठी (नम:) आमचा नमस्कार (अस्त्रु) असो (ते) (वायुसेवनाने पुष्ठ व स्वास्थ्य लाभ केलेले ते लोक (न:) आमचे (अवन्तु) रक्षण करोत. (ते) ते रक्षार्थी आम्ही लोक (यम्) ज्याचा (द्विष्म:) द्वेष करतो (च) आणि (य:) जो (न:) आमचा (द्वेष्टि) द्वेष करतो, (तम्) त्या द्वेषी मनुष्याला आम्ही (एषाम्) त्या जल आणि वायूच्या (जंभे) दु:खदायक हानिपद रुपात (पाण्यांत बुडवून वा वादळात (दध्म:) धारण करतो (ते द्वेषी दुष्टजन पाण्यात बुडून वा वारा-वादळात उद्ध्वस्त होऊन ठार व्हावेत) तुम्ही इतर लोकही आमच्याप्रमाणेच त्यांना नष्ट करा. ॥18॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. या मंत्रात शरदऋतूचे व्याख्यान वा विवेचन केले आहे. या मंत्रात देखील हाच उपदेश केला आहे की मनुष्यांनी योग्य रीतीने (या ऋतूत आवश्यक त्या) कार्यात मग्न असावे. ॥18॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय प्रतिपादित आहे -