Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 17

65 Mantra
15/17
Devata- वर्षुर्त्तर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- कृतिः Swara- निषादः
Mantra with Swara
अ॒यं प॒श्चाद् वि॒श्वव्य॑चा॒स्तस्य॒ रथ॑प्रोत॒श्चास॑मरथश्च सेनानीग्राम॒ण्यौ। प्र॒म्लोच॑न्ती चानु॒म्लोच॑न्ती चाप्स॒रसौ॑ व्या॒घ्रा हे॒तिः स॒र्पाः प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽअस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां॒ जम्भे॑ दध्मः॥१७॥

अ॒यम्। प॒श्चात्। वि॒श्वव्य॑चा॒ इति॑ वि॒श्वऽव्य॑चाः। तस्य॑। रथ॑प्रोत॒ इति॒ रथ॑ऽप्रोतः। च॒। अस॑मरथ॒ इत्यस॑मऽरथः। च॒। से॒ना॒नी॒ग्रा॒म॒ण्यौ। से॒ना॒नी॒ग्रा॒म॒न्याविति॑ सेनानीग्राम॒न्यौ। प्र॒म्लोच॒न्तीति॑ प्र॒ऽम्लोच॑न्ती। च॒। अ॒नु॒म्लोच॒न्तीत्य॑नु॒ऽम्लोच॑न्ती। च॒। अ॒प्स॒रसौ॑। व्या॒घ्राः। हे॒तिः। स॒र्पाः। प्रहे॑ति॒रिति॒ प्रऽहे॑तिः। तेभ्यः॑। नमः॑। अ॒स्तु॒। ते। नः॒। अ॒व॒न्तु॒। ते। नः॒। मृ॒ड॒य॒न्तु॒। ते। यम्। द्वि॒ष्मः। यः। च॒। नः॒। द्वेष्टि॑। तम्। ए॒षा॒म्। जम्भे॑। द॒ध्मः॒ ॥१७ ॥

Mantra without Swara
अयम्पश्चाद्विश्वव्यचास्तस्य रथप्रोतश्चासमरथश्च सेनानीग्रामण्या । प्रम्लोचन्ती चानुम्लोचन्ती चाप्सरसौ व्याघ्रा हेतिः सर्पा प्रहेतिस्तेभ्यो न मोऽअस्तु ते नो वन्तु ते नो मृडयन्तु ते यन्द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तमेषाञ्जम्भे दध्मः ॥

अयम्। पश्चात्। विश्वव्यचा इति विश्वऽव्यचाः। तस्य। रथप्रोत इति रथऽप्रोतः। च। असमरथ इत्यसमऽरथः। च। सेनानीग्रामण्यौ। सेनानीग्रामन्याविति सेनानीग्रामन्यौ। प्रम्लोचन्तीति प्रऽम्लोचन्ती। च। अनुम्लोचन्तीत्यनुऽम्लोचन्ती। च। अप्सरसौ। व्याघ्राः। हेतिः। सर्पाः। प्रहेतिरिति प्रऽहेतिः। तेभ्यः। नमः। अस्तु। ते। नः। अवन्तु। ते। नः। मृडयन्तु। ते। यम्। द्विष्मः। यः। च। नः। द्वेष्टि। तम्। एषाम्। जम्भे। दध्मः॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अयम्) हा (पश्चात्) नंतर वा मागून झालेला (विश्वण्यचा:) समस्त विश्वात व्याप्त झालेला विद्युतरुप अग्नी आहे. (पंधराव्या मंत्रात सूर्याच्या किरणरूप अग्नी विषयी (पुर:) पूर्वी विद्यमान) हे विशेषण वापरले आहे आणि या मंत्रात विद्युतरुप अग्नी विषयी (‘पश्चात्’ नंतर) असे विशेषण वापरले आहे - त्यावरून सूर्य ऊर्जा प्रथम व विद्युत-ऊर्जानंतर आहे, असा अर्थ अभिप्रेत वाटतो) त्या अग्नीची (दोन किरणें-अप्सरसौ आहेत) ज्याप्रमाणे (सेनानीग्रामण्यौ) सेनापती आणि ग्रामाध्यक्ष आपली कामें करतात, तद्वत (रथेप्रात:) रमणीय तेजामुळे सर्वत्र व्याप्त असलेली (च) आणि (असमरथ:) वेगात ज्याच्या बरोबरीचा दुसरा रथ नाही, अशी ती वेगवान असामान्य किरणे आहेत. याशिवाय (प्रम्लोचन्ती) सर्व औषधी-वनस्पती आदींना चांगल्याप्रकारे वाळवणारी (च) आणि (अनुलोचम्ती त्यानंतर त्या औषधींचे ज्ञान व महत्त्व विशद करणारी (च) अशी (अप्सरसौ) दोन क्रियाशील आकाशस्य किरणें आहेत, (ती किरणें व विद्युत वर्षाऋतूमधे आम्हांस सुखकारक ठरो. टीप- भावार्थामधे वर्षाऋतूचा संदर्भ सांगितला आहे, म्हणून येथे वर्षाऋतू अर्थ घेतला आहे) (हेति:) साधारण प्रहार करणार्‍या वज्राप्रमाणे प्रहारक आणि (प्रहेति:) विशेष अत्युम् वज्राप्रमाणे प्रहार करणारे जे (व्याप्रा:) सिंह आणि (सर्पा:) सायासारखे सर्वांना त्रास देणारे प्राणी आहेत, (तेभ्य), त्यांच्यावर (नम:) वज्रप्रहार (अस्तु) होवो (हानिकारक वाघ व साप यांसारखे प्राणी नष्ट व्हावेत) त्या प्राण्यांपासून जे आम्हा प्रजाजनांचे रक्षण करतात, (ते) ते लोक (न:) आमचे (अवन्तु) रक्षण करोत (ते) ते रक्षक गण (न:) आम्हाला (मृडयन्तु) सुखी करोत (ते) ते सुखार्थी आम्ही (यम्) ज्याचा (द्विष्म:) द्वेष करतो आणि जे दुष्ट लोक (न:) आमचा द्वेष करतात, त्या द्वेषीजनांना आम्ही (एजाम्) या वा त्या सिंह आदी वध करणार्‍या क्रूर पशूंच्या (जम्भे) मुखात (खाऊन टाकण्यासाठी त्यांच्यासमोर (दध्म:) फेकून देतो. (तम्) आमचे जे रक्षण करतात त्या रक्षक लोकांनीदेखील त्या द्वेषीजनांना सिंहादी पशूंपुढे टाकून ठार करावे. ॥17॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ह्या मंत्रात (अप्रत्यक्षपणे व भावार्थाने) वर्षाऋतूविषयी विवेचन केले आहे. मनुष्यांनी या ऋतूमधे आहार-विहारादीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. ॥17॥
Subject
पुढील मंत्रात देखील तोच विषय वर्णित आहे -