Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 16

65 Mantra
15/16
Devata- ग्रीष्मर्तुर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृत् प्रकृतिः Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒यं द॑क्षि॒णा वि॒श्वक॑र्मा॒ तस्य॑ रथस्व॒नश्च॒ रथे॑चित्रश्च सेनानीग्राम॒ण्यौ। मे॒न॒का च॑ सहज॒न्या चा॑प्स॒रसौ॑ यातु॒धाना॑ हे॒ती रक्षा॑सि॒ प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽअस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां॒ जम्भे॑ दध्मः॥१६

अ॒यम्। द॒क्षि॒णा। वि॒श्वक॒र्मेति॑ वि॒श्वऽक॑र्मा। तस्य॑। र॒थ॒स्व॒न इति॑ रथऽस्व॒नः। च॒। रथे॑चित्र॒ इति॒ रथे॑ऽचित्रः। च॒। से॒ना॒नी॒ग्रा॒म॒ण्यौ। से॒ना॒नी॒ग्रा॒म॒न्याविति॑ सेनानीग्राम॒न्यौ। मे॒न॒का। च॒। स॒ह॒ज॒न्येति॑ सहऽज॒न्या। च॒। अ॒प्स॒रसौ॑। या॒तु॒धाना॒ इति॑ यातु॒ऽधानाः॑। हे॒तिः। रक्षा॑सि। प्रहे॑ति॒रिति॒ प्रऽहे॑तिः। तेभ्यः॑। नमः॑। अ॒स्तु॒। ते। नः॒। अ॒व॒न्तु॒। ते। नः॒। मृ॒ड॒य॒न्तु॒। ते। यम्। द्वि॒ष्मः। यः। च॒। नः॒। द्वेष्टि॑। तम्। ए॒षा॒म्। जम्भे॑। द॒ध्मः॒ ॥१६ ॥

Mantra without Swara
अयन्दक्षिणा विश्वकर्मा तस्य रथस्वनश्च रथेचित्रश्च सेनानीग्रामण्या । मेनका च सहजन्या चाप्सरसौ यातुधाना हेती रक्षाँसि प्रहेतिस्तेभ्यो नमो अस्तु ते नो वन्तु ते नो मृडयन्तु ते यन्द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तमेषाञ्जम्भे दध्मः ॥

अयम्। दक्षिणा। विश्वकर्मेति विश्वऽकर्मा। तस्य। रथस्वन इति रथऽस्वनः। च। रथेचित्र इति रथेऽचित्रः। च। सेनानीग्रामण्यौ। सेनानीग्रामन्याविति सेनानीग्रामन्यौ। मेनका। च। सहजन्येति सहऽजन्या। च। अप्सरसौ। यातुधाना इति यातुऽधानाः। हेतिः। रक्षासि। प्रहेतिरिति प्रऽहेतिः। तेभ्यः। नमः। अस्तु। ते। नः। अवन्तु। ते। नः। मृडयन्तु। ते। यम्। द्विष्मः। यः। च। नः। द्वेष्टि। तम्। एषाम्। जम्भे। दध्मः॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अयम्) हे (विश्वकर्मा) प्राण्यांच्या क्रिया-व्यापार आदीचे जे कारण आहे, म्हणजे हा वायू (दक्षिणा) दक्षिण दिशेकडून येत असतो. (तस्य) त्या वायूचा आवाज (रथस्वन:) रथाच्या ध्वनीसारखा असून (च) आणि (रथेचित्र:) रथामधे जसे चित्र-विचित्र चित्र चित्रित असतात, तसा हा वायू अद्भुत कार्ये करणारा आहे. (च) आणि (सेनानीग्रामण्यौ) सेनापती आणि ग्रामाध्यक्षाप्रमाणे (मेनका) मनन करण्याचे साधन (च) आणि सहजन्या) एकावेळी उत्पन्न झालेल्या या (अप्सदस्तै) अंतरिक्षात. राहणारी दोन किरणें आदी अप्सरा आहेत. (या मनन आणि किरण रुप साधनांनी अद्भुत कार्य संपन्न करता येतात) (यातुधाना:) प्रजेला पीडा व त्रास देणारे जे लोक आहेत (चोर दरोडेखोर आदी), त्यांच्यावर (हेति:) वज्र (वीज) पठो (रक्षांसि) जे दुष्ट कुकर्मी आहेत, त्यांच्यावर (प्रहेति:) अधिक भयंकर वज्र पडों आणि (तेभ्य:) त्या प्रजापीडक लोकांवर (नम:) वज्राचा भीषण प्रहार (अस्तु) होवो. जे न्यायाधीश आणि शिक्षक आहेत, (ते) त्यानी (न:) अस्मची (अवन्तु) रक्षा करावी (ते) त्यानी (न:) आम्हां सामान्य प्रजाजनांना (मृडयन्तु) सुखी ठेवावे. (ते) ते आम्ही लोक (यम्) या दुष्टाचा (द्विष्म:) द्वेष करतो आणि (य:) नो दुष्ट (न:) आमचा (द्वेष्टि) द्वेष करीत असेल, (तम्) त्याला (एषाम्) या (तप्त उष्ण) वायूंच्या (जम्भे) वाप्पासारख्या भयानक मुखामधे (वादळ, वावटळ आदीसारख्या संकटांमधे) (दध्भ:) आम्ही घालू शकू, असे तुम्ही (राजा व राजपुरुष यांनी) यत्न करावेत (आम्ही दुष्टांचा विरोध करून त्यांना नष्ट करू शकू, अशी शक्ती आम्हाला द्या) ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक (विद्यावान वैज्ञानिक अथवा योगीजन) स्थूल, सूक्ष्म आणि मध्य याठिकाणी असलेल्या विविध प्रकारच्या वायूंपासून विविध हितकारी उपयोग घेऊ शकतात, तेच लोक अपाल्या शत्रूंना परास्त करून सर्वांना आनंदित करतात. येथील देखील ग्रीष्मऋतूविषयी विवेचन केले आहे, हे जाणावे. ॥16॥
Subject
पुनश्च, पुढील मंत्रात तोच विषय (किरणें आणि त्यांचा प्रभाव वर्णित आहे -