Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 15

65 Mantra
15/15
Devata- वसन्तर्तुर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- विकृतिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒यं पु॒रो हरि॑केशः॒ सूर्य॑रश्मि॒स्तस्य॑ रथगृ॒त्सश्च॒ रथौ॑जाश्च सेनानीग्राम॒ण्यौ। पु॒ञ्जि॒क॒स्थ॒ला च॑ क्रतुस्थ॒ला चा॑प्स॒रसौ॑ द॒ङ्क्ष्णवः॑ प॒शवो॑ हे॒तिः पौरु॑षेयो व॒धः प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽअस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां॒ जम्भे॑ दध्मः॥१५॥

अ॒यम्। पु॒रः। हरि॑केश॒ इति॒ हरि॑ऽकेशः। सूर्य॑रश्मि॒रिति॒ सूर्य॑ऽरश्मिः। तस्य॑। र॒थ॒गृ॒त्स इति॑ रथऽगृ॒त्सः। च॒। रथौ॑जा॒ इति॒ रथ॑ऽओजाः। च॒। से॒ना॒नी॒ग्रा॒म॒ण्यौ᳖। से॒ना॒नी॒ग्रा॒म॒न्याविति॑ सेनानीग्राम॒न्यौ᳖। पु॒ञ्जि॒क॒स्थ॒लेति॑ पुञ्जिकऽस्थ॒ला। च॒। क्र॒तु॒स्थ॒लेति॑ क्रतुऽस्थ॒ला। च॒। अ॒प्स॒रसौ॑। द॒ङ्क्ष्णवः॑। प॒शवः॑। हे॒तिः। पौरु॑षेयः। व॒धः। प्रहे॑ति॒रिति॒ प्रऽहे॑तिः। तेभ्यः॑। नमः॑। अ॒स्तु॒। ते। नः॒। अ॒व॒न्तु॒। ते। नः॒। मृ॒ड॒य॒न्तु॒। ते। यम्। द्वि॒ष्मः। यः। च॒। नः॒। द्वेष्टि॑। तम्। ए॒षा॒म्। जम्भे॑। द॒ध्मः॒ ॥१५ ॥

Mantra without Swara
अयम्पुरो हरिकेशः सूर्यरश्मिस्तस्य रथगृत्सश्च रथौजाश्च सेनानीग्रामण्या । पुञ्जिकस्थला च क्रतुस्थला चाप्सरसौ दङ्क्ष्णवः पशवो हेतिः पौरुषेयो वधः प्रहेतिस्तेभ्यो नमो अस्तु ते नो वन्तु ते नो मृडयन्तु ते यन्द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तमेषाञ्जम्भे दध्मः ॥

अयम्। पुरः। हरिकेश इति हरिऽकेशः। सूर्यरश्मिरिति सूर्यऽरश्मिः। तस्य। रथगृत्स इति रथऽगृत्सः। च। रथौजा इति रथऽओजाः। च। सेनानीग्रामण्यौ। सेनानीग्रामन्याविति सेनानीग्रामन्यौ। पुञ्जिकस्थलेति पुञ्जिकऽस्थला। च। क्रतुस्थलेति क्रतुऽस्थला। च। अप्सरसौ। दङ्क्ष्णवः। पशवः। हेतिः। पौरुषेयः। वधः। प्रहेतिरिति प्रऽहेतिः। तेभ्यः। नमः। अस्तु। ते। नः। अवन्तु। ते। नः। मृडयन्तु। ते। यम्। द्विष्मः। यः। च। नः। द्वेष्टि। तम्। एषाम्। जम्भे। दध्मः॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अयम्) या (ज्या (पुर:) पूर्वीपासून विद्यमान असलेली (हरिकेश:) हरणशील (उष्णतेने पदार्थाच्या पाण्याचे शोषण करणारी) आणि उष्णतेमुळे क्लेश आणि दाह उत्पन्न करणारी हरित आदी रंगांची (सूर्यरश्मि:) सूर्याची किरणें आहेत. (तस्य) त्या किरणांचा एक (रथगृत्स:) बुद्धिमान सारथी (सूर्य) आहे (च) आणि (रथौला:) रथ ओढणारे घोडे (सूर्याच्या प्रकाशातील सप्तरंग) आहेत. या सारथी आणि घोड्यांचे (सेनानी ग्रामण्यौ) जसे एखाद्या देशाचा सेनापती असतो आणि एखाद्या गावाचा ग्राम-प्रमुख (सरपंच) असतो, तसै (सारथी आणि घोडे) सूर्य आणि त्याची किरणें यांचेही अनेक प्रकार आहेत. (हिरवी, लाल, पिवळी, आदी रंगाची किरणे असतात) या किरणांची (पुज्जिकस्यला) एक सामान्य प्रमुख दिशा असते (च) आणि (ऋतुस्थला) प्रज्ञाकर्माचे ज्ञान देणारी उपदिशा असते (ही विविध रंगांची किरणे विशिष्ट दिशेने वा उपदिशेने प्रवास करतात) या प्रधान दिशा व उपदिशा दोन्हीना (अप्सरसौ) शरीरातील प्राणांमधे गती करणार्‍या अप्सरा म्हणतात. (दंड्क्ष्णव:) मांस आणि गवत खाणारे जे वाघ आदी (पशव:) हानिकारक पशु आहेत, त्यांच्यावर (हति:) वीज पडो (ग्राम्य पशू आणि माणसें यांची शिकार करणारे जे वाघ, बिबटे, लांडगे आदी नरभक्षी वा विनाशक पशू आहेत त्यांचा नाश होवो.) तसेच जे (पौकषय:) मनुष्य-समूहाची वा मानवाची (वध:) हत्या करणारे पशू आहेत आणि जे (प्रहेति) वज्राप्रमाणे मानव-समाजाचा नाश करणारे पशू आहेत, (तेभ्य:) त्यांच्यावर (नम:) वज्र (विद्युत) पडो. जे धार्मिक राजा आणि सभ्य न्यायप्रिय राजपुरूष आहेत, (ते) त्यानी त्या दुष्ट, क्रुर पशूंपासून (न:) आम्हा प्रजाजनांचे (अनन्तु) रक्षण करावे. (ते) त्या राजपुरुषांनी (न:) आम्हाला (मृऽयन्तु) सुखी करावे. (ते) ते आमचे रक्षण करणारे राजाधिकारी (यम्) ज्या हिंसक पशू, चोर-दरोडेखोर आदी क्रूर लोकांचा (द्विष्य:) विरोध करतात (त्यांना कैद करतात वा ठार मारतात) (च) आणि (य:) जो हिंसक (न:) आम्हां प्रजाजनांचा (द्वेष्टि) विरोध करतो वा आम्हाला त्रास देतो (तम्) त्या हिंसक चोर-लुटारू लोकांना राजपुरुषांनी (एषाम्) त्या हिंसक वाघ आदी पशूंचा (जन्मे) तोंडी (दध्य:) द्यावे (लुटारु, दरोडेखोरांना ठार मारावे) ॥15॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सूर्याची एक किरण (एकरंग) हिरव्या रंगाची आहे, तसेच लाल, पिवळा आदी रंगांची किरणे देखील आहेत (आणि ती किरणें आपल्या रंगाच्या प्रभावाने प्राण्यांची रक्षा करतात) त्याप्रमाणे सेनापती आणि ग्रामाध्यक्ष (गुण-प्रमुख वा सरपंच) आदींनी आचरण ठेवावे आणि संकट, भयादीपासून सर्वांची रक्षा करावी. जसे राजा आणि राजपुरुष मनुष्य-भक्षी सिंह आदी पशूंना बंद करतात वा मारतात आणि गौ आदी उपकारक पशूंचे रक्षण-पोषण करतात, तद्वत विद्वान लोकांनी आम्हां सामान्य प्राजाजनांना चांगले शिक्षण देऊन, अधर्माचरणापासून दूर ठेऊन धर्ममार्गावर चालवावे आणि अ्रशाप्रकारे सर्व चांगल्या लोकांचे रक्षण करीत द्वेषी, हिंसक वा दुष्टजनांना आमच्यापासून दूर ठेवावे. या मंत्रात वसंतऋतू संबंधी सांगितले आहे. हे सर्व वसंत ऋतूचे विवेचन आहे, असे जाणावे ॥15॥
Subject
आता पुढील मंत्रात किरण आदी पदार्थांचे उदाहरण देऊन सत्यविद्येविषयी उपदेश केला आहे-