Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 1

65 Mantra
15/1
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अग्ने॑ जा॒तान् प्र णु॑दा नः स॒पत्ना॒न् प्रत्यजा॑तान् नुद जातवेदः। अधि॑ नो ब्रूहि सु॒मना॒ऽअहे॑डँ॒स्तव॑ स्याम॒ शर्म॑ꣳस्त्रि॒वरू॑थऽउ॒द्भौ॥१॥

अग्ने॑। जा॒तान्। प्र। नु॒द॒। नः॒। स॒पत्ना॒निति स॒ऽपत्ना॑न्। प्रतिं॑। अजा॑तान्। नु॒द॒। जा॒त॒वे॒द॒ इति॑ जातऽवेदः। अधि॑। नः॒। ब्रू॒हि॒। सु॒मना॒ इति॑ सु॒ऽमनाः॑। अहे॑डन्। तव॑। स्या॒म। शर्म॑न्। त्रि॒वरू॑थ इति॑ त्रि॒ऽवरू॑थे। उ॒द्भावित्यु॒त्ऽभौ ॥१ ॥

Mantra without Swara
अग्ने जातान्प्रणुदा नः सपत्नान्प्रत्यजातान्नुद जातवेदः । अधि नो ब्रूहि सुमनाऽअहेडँस्तव स्याम शर्मँस्त्रिवरूथऽउद्भौ ॥

अग्ने। जातान्। प्र। नुद। नः। सपत्नानिति सऽपत्नान्। प्रतिं। अजातान्। नुद। जातवेद इति जातऽवेदः। अधि। नः। ब्रूहि। सुमना इति सुऽमनाः। अहेडन्। तव। स्याम। शर्मन्। त्रिवरूथ इति त्रिऽवरूथे। उद्भावित्युत्ऽभौ॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) राजा अथवा हे सेनापती, आपण (न:) आमच्या (आम्हा प्रजाजनांच्या) जातान्) ज्ञात वा प्रत्यक्ष (सपत्रान्) शत्रूंना (प्र नुद) दूर करा (आमच्यापासून दूर ठेवा वा आम्हाला त्याच्यापासून निर्भव ठेवा) हे (जातवेद:) अतिबलशाली (राजा) (अथवा, राज्यात कुठे काय चालले आहे, याची हेरांमार्फत) बित्तंबातमी माहिती असणारे हे शका) आपण (आजातान्) परोक्षपणे वा गुप्तपणे आमचे शत्रू असणार्‍या शत्रूंना (नुद) दूर जाण्याची प्रेरणा करा (आमच्यापासून दूर ठेवा) आपण आमचा (अथवा (आमच्या निवेदनाचा) (अहेहन्) अनादर वा उपेक्षा न करता (न) प्रति) आमच्याप्रत सदा (सुममा:) प्रसन्न वा अनुकूल रहा आणि आम्हांस (अथिब्रुहि) योग्य तो उपदेश करा की ज्यायोगे आम्ही प्रजाजन (तर) तुमच्या (तुम्ही दिलेल्या (उभ्द्रौ) उत्तम पदार्थांचा उपयोग घेत (त्रिवरुथे) आध्यात्मिक, आधि भौतिक आणि अधिदैविक या तीन प्रकारचे सुख अनुभवीत (शर्मन्) आमच्या घरामधे (स्थाम) आनंदी शकू शकू. ॥1॥
Essence
भावार्थ - राजा, न्यायाधीश आणि सभासद यांना (लोकसभा व राज्यसभेचा सदस्यांना) आवश्यक आहे की त्यांनी गुप्तहेरांद्वारे ज्ञात व अज्ञात शत्रूंचा शोध घ्यावा (गुप्त वा उघड शत्रूविषयी अधिक माहिती मिळवा व शत्रूंचा शोधून काढा) आणि त्या शत्रूंना अवश्य निरस्त वा बंदिस्त करावे. तसेच हेही पहावे की त्यांच्याकडून कोण धर्मात्मा व्यक्तीचा अवमान व उपेक्षा होऊ नये आणि कोणा अधर्मी माणसाचा सत्कार त्यांनी कदापी करू नये. असे कैलास सर्व सज्जन लोक राज्यामधे सुखी आणि निर्भय राहतील. ॥1॥
Subject
आता पंधरावा अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या पहिल्या मंत्रामधे राजा आणि राजपुरुषांच्या कर्तव्यांविषयी सांगितले आहे -