Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 14 / Mantra 6

31 Mantra
14/6
Devata- ग्रीष्मर्तुर्देवता Rishi- उशना ऋषिः Chhand- निचृदुत्कृतिः Swara- षड्जः
Mantra with Swara
शु॒क्रश्च॒ शुचि॑श्च॒ ग्रैष्मा॑वृ॒तूऽ अ॒ग्नेर॑न्तःश्लेषोऽसि॒ कल्पे॑तां॒ द्यावा॑पृथि॒वी कल्प॑न्ता॒माप॒ऽ ओष॑धयः॒ कल्प॑न्ताम॒ग्नयः॒ पृथ॒ङ् मम॒ ज्यैष्ठ्या॑य॒ सव्र॑ताः। येऽअ॒ग्नयः॒ सम॑नसोऽन्त॒रा द्यावा॑पृथि॒वीऽइ॒मे। ग्रैष्मा॑वृ॒तूऽ अ॑भि॒कल्प॑माना॒ऽइन्द्र॑मिव दे॒वाऽअ॑भि॒संवि॑शन्तु॒ तया॑ दे॒वत॑याङ्गिर॒स्वद् ध्रु॒वे सी॑दतम्॥६॥

शु॒क्रः। च॒। शुचिः॑। च॒। ग्रैष्मौ॑। ऋ॒तू। अ॒ग्नेः। अ॒न्तः॒श्ले॒ष इत्य॑न्तःऽश्ले॒षः। अ॒सि॒। कल्पे॑ताम्। द्यावा॑पृथि॒वी इति॒ द्यावा॑ऽपृथि॒वी। कल्प॑न्ताम्। आपः॑। ओष॑धयः। कल्प॑न्ताम्। अ॒ग्नयः॑। पृथ॑क्। मम॑। ज्यैष्ठ्या॑य। सव्र॑ता॒ इति॒ सऽव्र॑ताः। ये। अ॒ग्नयः॑। सम॑नस॒ इति॒ सऽम॑नसः। अ॒न्त॒रा। द्यावा॑पृथि॒वी इति॒ द्यावा॑ऽपृथि॒वी। इ॒मेऽइती॒मे। ग्रैष्मौ॑। ऋ॒तूऽइत्यृ॒तू। अ॒भि॒कल्प॑माना॒ इत्य॑भि॒ऽकल्प॑मानाः। इन्द्र॑मि॒वेतीन्द्र॑म्ऽइव। दे॒वाः। अ॒भि॒संवि॑श॒न्त्वित्य॑भि॒ऽसंवि॑शन्तु। तया॑। दे॒वत॑या। अ॒ङ्गि॒र॒स्वत्। ध्रु॒वे इति॑ ध्रु॒वे। सी॒द॒त॒म् ॥६ ॥

Mantra without Swara
शुक्रश्च शुचिश्च ग्रैष्मावृतूऽअग्नेरन्तःश्लेषोसि कल्पेतान्द्यावापृथिवी कल्पन्तामापऽओषधयः कल्पन्तामग्नयः पृथङ्मम ज्यैष्ठ्याय सव्रताः । येऽअग्नयः समनसोन्तरा द्यावापृथिवीऽइमे ग्रैष्मावृतूऽअभिकल्पमानाऽइन्द्रमिव देवाऽअभिसँविशन्तु तया देवतयाङ्गिरस्वद्धरुवे सीदतम् ॥

शुक्रः। च। शुचिः। च। ग्रैष्मौ। ऋतू। अग्नेः। अन्तःश्लेष इत्यन्तःऽश्लेषः। असि। कल्पेताम्। द्यावापृथिवी इति द्यावाऽपृथिवी। कल्पन्ताम्। आपः। ओषधयः। कल्पन्ताम्। अग्नयः। पृथक्। मम। ज्यैष्ठ्याय। सव्रता इति सऽव्रताः। ये। अग्नयः। समनस इति सऽमनसः। अन्तरा। द्यावापृथिवी इति द्यावाऽपृथिवी। इमेऽइतीमे। ग्रैष्मौ। ऋतूऽइत्यृतू। अभिकल्पमाना इत्यभिऽकल्पमानाः। इन्द्रमिवेतीन्द्रम्ऽइव। देवाः। अभिसंविशन्त्वित्यभिऽसंविशन्तु। तया। देवतया। अङ्गिरस्वत्। ध्रुवे इति ध्रुवे। सीदतम्॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे स्त्री-पुरुषहो, (मम) मला हे दोन महिने (ज्यैष्ठ्याय) प्रशंसनीय वा प्रिय (वाटत नाहीत अथवा मला प्रशंसा व कीर्ती मिळविण्यासाठी हे दोन महिने, साहाय्यभूत आहेत) या महिन्यांत (शुक्र:) जोराचा सुसाट वारा, (झळा) वादळ, धुळीचा जाट (बावटळी) आणि तीव्र उष्णता याद्वारे आकाशाला मलिन करणारा ज्येष्ठ मास आहे (च) आणि (शुचि:) पवित्रतेचे कारण असलेला आषाढ मास (च) आहे. या दोन महिन्याना मिळून (ग्रॅष्मी) ग्रीष्म (ऋतू) ऋतू म्हटले जाते. या काळात (अग्ने:) अग्नी (वा उष्णतेमुळे) (अन्त:श्लेष:) कफजन्य रोग दूर (असि) होतात. या ग्रीष्मऋतूत (द्यावापृथिवी) प्रकाश आणि अंतरिक्ष (कल्पताम्) योग्य प्रमाणात असावेत (सूर्यप्रकाश अति लापदायक आणि आकाश धूळ-मातीने भरलेला असू नये, अशी कामना आहे) या ग्रीष्मऋतूत (आप:) पाणी (कल्पन्ताम्) सर्वत्र उपलब्ध व्हावे. (ओषधय:) यव, सोमलता आदी औषधी तसेच (अग्नय:) विद्युत आदी अग्नीचे विविध रूप आमच्यासाठी (पृथवू स्वतंत्रपणाने (कल्पन्ताम्) उपयोगी व्हावेत. (अशा त्रासदायक उन्हाळ्यामध्ये देखील) (समनस:) सुविचारी (सव्रता:) सत्याचरण आणि सद्नियमांचे पालन करणारे (अग्नय:) अग्नीप्रमाणे तेजस्वी लोक (अन्तरा) (ग्रॅष्मी) (ऋतू) (अभिकल्पमाना:) त्या तीव्र ग्रीष्मऋतूचा सामना करतात आणि (देवा:) विद्वान वैज्ञानिकजनांनी (इन्द्रमिव) विद्युत आणि अग्नीच्या विविध रुपांविषयी (अभिसंविशन्तु) सर्वप्रकारे गतिमान रहावे (विद्युत आदी अग्नीविषयी नूतन शोध करावा. त्या संहारक, दाहक अग्नीला देखील उपकारक व हितकारी कसे करता येईल, हे पहावे) हे पति-पत्नी, त्या विद्वानांप्रमाणे तुम्ही (तया) देवतया) त्या परमेश्वराच्या प्रेरणेने (इमे) या घावापृथिवी) प्रकाशलोक आणि पृथ्वीच्या सातत्य ठेवून आणि (धु्रवे) दृढ राहून (अहिरस्वत्) शरीराच्या अवयवांच्या कार्याचे कारण जे शरीरात रस, त्या रसाप्रमाणे (सीदतय्) विशेषत्वाने ज्ञानप्राप्तीसाठी प्रवृत्त रहा (उन्हाळ्यात रसामुळे शरीराची कार्यशक्ती वाढते, तो रस कसा वाढेल, हे पहा) ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. (मागील काही मंत्रामधे) वसंतू ऋतूचे वर्णन केल्यानंतर आता ग्रीष्म ऋतूचे विषय प्रतिपादन करीत आहोत. हे मनुष्यांनो, पृथ्वी आदी पंचभूतांमधे शरीरविषयक आणि मनविषयक जे अग्नी आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही अधिकाधिक ज्ञान मिळवा आणि त्या अग्नीच्या विविध रुपांपासून उपयोग घेऊन सर्व प्राण्यांना सुख मिळेल, असे करा (हे आवश्यक आहे, कारण की) पंच महाभूतांतील अग्नीविना ग्रीष्मऋतू संभवत नाही. (अग्नी, वायू, भूमी, जल, आकाश यांमध्ये अग्नी वेगवेगळ्या रुपात असतो. त्यामुळेच उन्हाळा होतो. याविषयी अधिक ज्ञान मिळवावे, असे मंत्रार्थांने सूचित केले आहे) ॥6॥
Subject
आता ग्रीष्म ऋतूविषयी प्रतिपादन केले आहे -