Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 14 / Mantra 5

31 Mantra
14/5
Devata- अश्विनौ देवते Rishi- उशना ऋषिः Chhand- स्वराड्ब्राह्मी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
अदि॑त्यास्त्वा पृ॒ष्ठे सा॑दयाम्य॒न्तरि॑क्षस्य ध॒र्त्री वि॒ष्टम्भ॑नीं दि॒शामधि॑पत्नीं॒ भुव॑नानाम्। ऊ॒र्मिर्द्र॒प्सोऽअ॒पाम॑सि वि॒श्वक॑र्मा त॒ऽऋषि॑रश्विना॑ध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑॥५॥

अदि॑त्याः। त्वा॒। पृ॒ष्ठे। सा॒द॒या॒मि। अ॒न्तरि॑क्षस्य। ध॒र्त्रीम्। वि॒ष्टम्भ॑नीम्। दि॒शाम्। अधि॑पत्नी॒मित्यधि॑ऽपत्नीम्। भुव॑नानाम्। ऊ॒र्मिः। द्र॒प्सः। अ॒पाम्। अ॒सि॒। वि॒श्वक॒र्मेति॑ वि॒श्वऽक॑र्मा। ते॒। ऋषिः॑। अ॒श्विना॑। अ॒ध्व॒र्यूऽइत्य॑ध्व॒र्यू। सा॒द॒य॒ता॒म्। इ॒ह। त्वा॒ ॥५ ॥

Mantra without Swara
अदित्यास्त्वा पृष्ठे सादयाम्यन्तरिक्षस्य धर्त्रीँविष्टम्भनीन्दिशामधिपत्नीम्भुवनानाम्। उर्मिर्द्रप्सोऽअपामसि विश्वकर्मा तऽऋषिरश्विनाध्वर्यू सादयतामिह त्वा ॥

अदित्याः। त्वा। पृष्ठे। सादयामि। अन्तरिक्षस्य। धर्त्रीम्। विष्टम्भनीम्। दिशाम्। अधिपत्नीमित्यधिऽपत्नीम्। भुवनानाम्। ऊर्मिः। द्रप्सः। अपाम्। असि। विश्वकर्मेति विश्वऽकर्मा। ते। ऋषिः। अश्विना। अध्वर्यूऽइत्यध्वर्यू। सादयताम्। इह। त्वा॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पती पत्नीस म्हणत आहे) हे पत्नी, (ते) तुझा (विश्वकर्मा) सर्व शुभ कर्म करणारा आणि (ऋषि:) विज्ञानवान पती, मी (अन्तरिक्षस्य) माझ्या अंत:करणात असणारे अविनाशी विज्ञान (धर्त्रीम्) तुला देत आहे, त्याला तू (धर्त्रीम्) धारण करणारी (ग्रहण करणारी) आहेस. तू (दिशाम्) पूर्व आदी दिशांचा (निष्टम्प्रमांम्) आधार आणि (भुवनानाम्) संतानोत्वतीकरिता मा घराची (अधिपत्नीम्) स्वामिनी व संतानांचे पालन करणारी आहेस. म्हणून मी (त्वा) तुला सूर्यांच्या किरणांप्रमाणे (आदित्या:) (पृष्ठे) या भूतलावर (सादयामि) नियुक्त करीत आहे. (घराची स्वामिनी व व्यवस्थापिका म्हणून तुला जबाबदारी सोपवीत आहे) हे पत्नी, तू (अपाम्) जलाच्या (ऊर्मि:) तरंगांप्रमाणे (दुप्स:) आनंदमयी (उत्साह आणि आनंदाने सतत कार्यमग्न राहणारी) (असि) आहेस. (त्वा) तुला (इह) या गृहाश्रमात (अध्वर्यू) रक्षण आणि कल्याणाकरिता यज्ञ करणारी याज्ञिक तसेच (अश्विना) विद्यमान अध्यापक व प्रेरक उपदेशक मनुष्य यांनी (सादयताम्) तुला स्थिर करावी (तुला, विद्या, उपदेश देऊन आणि यज्ञ करून त्यांनी तुला प्रेरणा द्यावी) ॥5॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्या स्त्रिया स्थायी सुख देणार्‍या असून ज्यांची सर्वत्र कीर्ती पसरलेली आहे आणि ज्या आपल्या विद्यावान पतीसह आनंदीत असतात, त्याच गृहाश्रमधर्माचे पालन करण्यात आणि घरच्या उत्कर्ष साधणार्‍या असतात.
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय प्रतिपादित आहे-
Footnote
टीप - तेराव्या अध्यायातील मंत्र क्र. 25 ‘मधुश्च माधवश्च’ पासून येथपर्यंत मुख्यत्वाने वसंत ऋतूच्या गुणांचे व्याख्यान केले आहे, असे जाणावे. ॥5॥