Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 14 / Mantra 21

31 Mantra
14/21
Devata- विदुषी देवता Rishi- विश्वदेव ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
मू॒र्द्धासि॒ राड् ध्रु॒वासि॑ ध॒रुणा॑ ध॒र्त्र्यसि॒ धर॑णी। आयु॑षे त्वा॒ वर्च॑से त्वा कृ॒ष्यै त्वा॒ क्षेमा॑य त्वा॥२१॥

मू॒र्द्धा। अ॒सि॒। राट्। ध्रु॒वा। अ॒सि॒। ध॒रुणा॑। ध॒र्त्री। अ॒सि॒। धर॑णी। आयु॑षे। त्वा॒। वर्च॑से। त्वा॒। कृ॒ष्यै। त्वा॒। क्षेमा॑य। त्वा॒ ॥२१ ॥

Mantra without Swara
मूर्धासि राड्धु्रवासि धरुणा धर्त्र्यसि धरणी । आयुषे त्वा वर्चसे त्वा कृष्यै त्वा क्षेमाय त्वा ॥

मूर्द्धा। असि। राट्। ध्रुवा। असि। धरुणा। धर्त्री। असि। धरणी। आयुषे। त्वा। वर्चसे। त्वा। कृष्यै। त्वा। क्षेमाय। त्वा॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पती पत्नीस म्हणत आहे अथवा विवाहसंस्काराच्या वेळी पाणिग्रहण-विधी करतांना वर म्हणत आहे, असा या मंत्राचा संदर्भ सांगता येतो) हे पत्नी, (वा हे वधू,) तू सूर्याप्रमाणे (मूर्द्धा) सर्वांहून उत्तम (असि) आहेत. (राट्) प्रकाशाप्रमाणे कीर्तिमंत आणि (ध्रुवा) (या घरात) स्थिर वा स्थिर राहणारी (असि) आहेस. (धरुणा) पुष्टिकारी (धरणी) आधाररुप पृथ्वीप्रमाणे तू (धर्त्री) या घरात सर्वांना सुखविणारी व घराचा आधार (असि) आहेत वा हो. अशा (त्वा) तुला मी (आयुवे) दीर्घ जीवनासाठी (त्वा) तुला ग्रहण करीत आहे (वर्चसे) अन्नधान्यासाठी आणि (त्वा) तुला (कृष्यै) कृषिकर्मात सहाय्य करण्यासाठी आणि (त्वा) तुला (क्षेत्राय) तुझे आणि माझे क्षेम-कुशल होण्यासाठी सत्य मनाने ग्रहण करीत आहे. ॥21॥
Essence
भावार्थ - शरीरातील उत्तमांग म्हणजे शीर, शिरामुळे सर्वांचे जीवन आहे सुराज्यामुळे लक्ष्मी (धन-संपदा) असते, कृषीमुळे अन्न-धान्य आदी पदार्थ प्राप्त होतात आणि घरामुळे रक्षण होते. ही पृथ्वी सर्वांचा आधार असून मातेप्रमाणे माननीय आहे, विदुषी स्त्रियांनी या पृथ्वीप्रमाणे असावे. ॥21॥
Subject
विदुषी स्त्री कशी असावी, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे-