Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 14 / Mantra 20

31 Mantra
14/20
Devata- अग्न्यादयो देवताः Rishi- विश्वदेव ऋषिः Chhand- भुरिग्ब्राह्मी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒ग्निर्दे॒वता॒ वातो॑ दे॒वता॒ सूर्यो॑ दे॒वता॑ च॒न्द्रमा॑ दे॒वता॒ वस॑वो दे॒वता॑ रु॒द्रा दे॒वता॑ऽऽदि॒त्या दे॒वता॑ म॒रुतो॑ दे॒वता॒ विश्वे॑ दे॒वा दे॒वता॒ बृह॒स्पति॑र्दे॒वतेन्द्रो॑ दे॒वता॒ वरु॑णो दे॒वता॑॥२०॥

अ॒ग्निः। दे॒वता॑। वातः॑। दे॒वता॑। सूर्यः॑। दे॒वता॑। च॒न्द्रमाः॑। दे॒वता॑। वस॑वः। दे॒वता॑। रु॒द्राः। दे॒वता॑। आ॒दि॒त्याः। दे॒वता॑। म॒रुतः॑। दे॒वता॑। विश्वे॑। दे॒वाः। दे॒वता॑। बृह॒स्पतिः॑। दे॒वता॑। इन्द्रः॑। दे॒वता॑। वरु॑णः। दे॒वता॑ ॥२० ॥

Mantra without Swara
अग्निर्देवता वातो देवता सूर्या देवता चन्द्रमा देवता वसवो देवता रुद्रा देवता आदित्या देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता ॥

अग्निः। देवता। वातः। देवता। सूर्यः। देवता। चन्द्रमाः। देवता। वसवः। देवता। रुद्राः। देवता। आदित्याः। देवता। मरुतः। देवता। विश्वे। देवाः। देवता। बृहस्पतिः। देवता। इन्द्रः। देवता। वरुणः। देवता॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या मंत्रात ‘देवता’ शब्दाचा अनेकवार उपयोग केला आहे, म्हणून ‘देवता’ या शब्दाचा भावार्थामधे दिलेला अर्थ आधी वाचावा कोण आहे देवता? सद्गुणयुक्त पदार्थ आहेत, ते दिव्य गुण, कर्म, स्वभाव असल्यामुळे ‘देवता’ आहेत. संस्कृत भाष्यात महर्षीनी देवता= देव एव दिव्यगुणत्वात्, तसेच देवता = दिव्यगुणयुक्ता मनुष्या: पदार्थाश्च / असे लिहिले आहे. त्यामुळे या मंत्रात कल्पित शरीरधारी देवता हा अर्थ घेऊन नये) - हे स्त्री-पुरुष हो, तुम्ही निश्चयाने जाणा की (अग्नि:) आग (देवता) दिव्य गुणवान आहे (अथवा देवो कस्मात्? दानात्, द्योतनात्, दीपनाद्वा- प्रकाश, उष्णता देणारा म्हणून अग्नी देवता आहे.) (वात:) पवन (देवता) शुद्ध गुणयुक्त आहे (सूर्य्य:) सूर्य (देवता) चांगले गुण देणारा आहे. (चन्द्रमा:) चंद्र (देवता) शुद्ध गुणयुक्त आहे. (वसव:) प्रसिद्ध आठ अग्नी आदी पदार्थ अथवा प्रथम कोटीचे विद्वान (देवता) दिव्यगुणवान (आणि ज्ञान देणारे म्हणून देवता) आहेत. (रुद्रा:) प्राण आदी अकरा रुद्र अथवा मध्यम कोटीचे विद्वान (वेदता) शुद्धगुणवान आहेत (आदित्या:) बारा महिने अथवा उत्तम कोटीचे विद्वान (देवता) शुद्ध गुणवान आहेत. (अरुत:) मननशील विद्वान् ऋत्विकगण (देवता) दिव्यगुण वात आहेत. (विश्वो) सर्व (देवता) सद्गुणी माणसे अथवा दिव्य पदार्थ (देवता) यांचाही संज्ञा देवता आहे. (बृहस्पति:) दृढ वा एकवचनी मनुष्य किंवा ब्रह्मांडरक्षक परमेश्वर (देवता) (दिव्यगुणवान सर्वदानी) देवता आहे. (इन्द्र:) विद्युत व श्रेष्ठ धनदेखील (देवता) सद्गुणवान आहेत, तुम्ही या पदार्थांना निश्चयाने असेच जाणा. ॥20॥
Essence
भावार्थ - या जगात जे चांगले गुण असलेले पदार्थ आहेत, ते दिव्यगुण, कर्म आणि स्वभाव असलेले असल्यामुळे ‘देवता’ असे म्हणले जातात. याशिवाय जो सर्व देवांचा देव असल्यामुळे ‘महादेव’ आहे, तो सर्वांचा धारणकर्ता, सर्वरचदिल, सर्वरक्षक, जगव्यवस्थापक आणि प्रलयकारी असून सर्वशक्तिमान, दयाळू, न्यायकारी आणि अजन्मा आहे. सर्वांचा जो स्वामी त्या परमात्म्यालाच सर्वांनी जाणावे (त्यालाच महादेव मानावे) ॥20॥
Subject
पुनश्च पुढील मंत्रात तोच विषय वर्णित आहे -