Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 9

58 Mantra
13/9
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- भुरिक् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
कृ॒णु॒ष्व पाजः॒ प्रसि॑तिं॒ न पृ॒थ्वीं या॒हि राजे॒वाम॑वाँ॒२ऽ इभो॑न। तृ॒ष्वीमनु॒ प्रसि॑तिं द्रूणा॒नोऽस्ता॑सि॒ विध्य॑ र॒क्षस॒स्तपि॑ष्ठैः॥९॥

कृ॒णु॒ष्व। पाजः॑। प्रसि॑ति॒मिति॒ प्रऽसि॑तिम्। न। पृ॒थ्वीम्। या॒हि। राजे॒वेति॒ राजा॑ऽ इव। अम॑वा॒नित्यम॑ऽवान्। इभे॑न। तृ॒ष्वीम्। अनु॑। प्रसि॑ति॒मिति॒ प्रऽसि॑तिम्। द्रू॒णा॒नः। अस्ता॑। अ॒सि॒। विध्य॑। र॒क्षसः॑। तपि॑ष्ठैः ॥९ ॥

Mantra without Swara
कृणुष्व पाजः प्रसितिन्न पृथ्वीँयाहि राजेवामवाँऽइभेन । तृष्वीमनु प्रसितिन्द्रूणानो स्तासि विध्य रक्षसस्तपिष्ठैः ॥

कृणुष्व। पाजः। प्रसितिमिति प्रऽसितिम्। न। पृथ्वीम्। याहि। राजेवेति राजाऽ इव। अमवानित्यमऽवान्। इभेन। तृष्वीम्। अनु। प्रसितिमिति प्रऽसितिम्। द्रूणानः। अस्ता। असि। विध्य। रक्षसः। तपिष्ठैः॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन अपेक्षा व्यक्त करीत आहेत) हे सेनापती, आपण (पान:) शक्ती (कृष्णुष्व) प्राप्त करा (अतिशक्तिमान व्हा) (ज्याप्रमाणे कोळी वा शिकारी जाळे वा पाशामध्ये प्राण्यांना कैद करतात, त्याप्रमाणे) आपण (पृथिवीम्‌) भूमीला (प्रतितिंम्‌) (न) पाशात पकडल्याप्रमाणे (याहिं) वश करा. आपण (अस्ता) पाश फेकणारे (वश करणारे) (असि) व्हा. ज्याप्रमाणे एक राजा (इभेन) हस्तीसैन्यामुळे आणि (अममान्‌) अनेक मंत्री वा दूतांमुळे शक्तिमान होतो, तद्वत आपण (तपिष्ठै:) अत्यंत पीडाकारी शस्त्रांनी (प्रसितिम्‌) आणि पाशादींनी (मुस्क्या बांधणे, कैदेत टाकणें आदी शिक्षा देऊन (रक्षस:) शत्रूचा (द्रणान:) विनाश करीत (तृष्णीवम्‌) शीघ्र (वा अकस्मात) शत्रूच्या (अनु) सम्मुख घेऊन त्याला (विध्य) ताडन, मारण करा वा. त्याला बंदिस्त करा. ॥9॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. सेनापतीसाठी हे आवश्‍यक आहे की त्याने राजाप्रमाणेच बलवान असावे. त्याला पाश आदी बंधनांद्वारे शत्रूला बंदिस्त करना कैद करण्याची रीती अवगत असावी. शत्रूला बाणांनी विद्ध करता यावे आणि त्यास बंदिशाळेत बंदिस्त करून ठेवावे आणि अशा प्रकारे श्रेष्ठजनांचे रक्षण-पालन करावे. ॥9॥
Subject
राजपुरुषांनी शत्रूंना कशाप्रकारे वश करावे वा बंदिस्त करावे, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -