Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 7

58 Mantra
13/7
Devata- ईश्वरो देवता Rishi- हिरण्यगर्भ ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
याऽइष॑वो यातु॒धाना॑नां॒ ये वा॒ वन॒स्पतीँ॒१ऽरनु॑। ये वा॑व॒टेषु॒ शेर॑ते॒ तेभ्यः॑ स॒र्पेभ्यो॒ नमः॑॥७॥

याः। इष॑वः। या॒तु॒धाना॑ना॒मिति॑ यातु॒ऽधाना॑नाम्। ये। वा॒। वन॒स्पती॑न्। अनु॑। ये। वा॒। अ॒व॒टेषु॑। शेर॑ते। तेभ्यः॑। स॒र्पेभ्यः॑। नमः॑ ॥७ ॥

Mantra without Swara
याऽइषवो यातुधानानाँये वा वनस्पतीँरनु । ये वावटेषु शेरते तेभ्यः सर्पेभ्यो नमः ॥

याः। इषवः। यातुधानानामिति यातुऽधानानाम्। ये। वा। वनस्पतीन्। अनु। ये। वा। अवटेषु। शेरते। तेभ्यः। सर्पेभ्यः। नमः॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यातुधानानाम्‌) दुसऱ्याच्या धनाचे अपहरण करणारे (चोर, लुटारू आदी) दुष्ट माणसांची (या:) जी (इषव:) दुष्ट प्रवृत्ती वा कर्में आहेत, (वा) तसेच (ये) जे (वनस्पतीत्‌) वटवृक्षादी दाट वनस्पतीत (घनदाट अरण्यात) (अनु) लपून राहतात (वा) अथवा (ये) जे (दरोडेखोर, लुटारू) (अवटेषु) वाटेतील गुप्तस्थानांत वा मार्गात (शेरते) राहतात, लपून बसलेले असतात, (तेभ्य:) त्या सर्वा (सर्पेभ्य:) दुष्ट प्राण्यांविरूद्ध तुम्ही (सन्मार्गी आणि वीरमाणसें) (नम:) वज्र (अति घातक अस्त्र-शस्त्र) चालवा. त्या दृष्टांना ठार मारावे ॥7॥^(यातुधानानाम्‌=ये यन्ति परपदार्थान्‌ दघति तेषाम्‌)
Essence
भावार्थ- मनुष्यांनी मार्गात अथवा वनात जे लुटारू, दरोडेखोर दुष्ट लोक दिवसा लपून, दडून बसलेले असतात (आणि लोकांना लुटून, मारहाण करून, त्रास देतात) अशा लुटारूंना आणि सर्प आदी (विषारी हिंस्त्रक जीवांना) शस्त्राने वा औषधीप्रयोगाने जीवे मारावे ॥7॥
Subject
पुढील मंत्रात देखील मनुष्यांनी कसे असावे, याचविषयी प्रतिपादन केले आहे -