Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 6

58 Mantra
13/6
Devata- ईश्वरो देवता Rishi- हिरण्यगर्भ ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
नमो॑ऽस्तु स॒र्पेभ्यो॒ ये के च॑ पृथि॒वीमनु॑। येऽ अ॒न्तरि॑क्षे॒ ये दि॒वि तेभ्यः॑ स॒र्पेभ्यो॒ नमः॑॥६॥

नमः॑। अ॒स्तु॒। स॒र्पेभ्यः॑। ये। के। च॒। पृ॒थि॒वीम्। अनु॑। ये। अ॒न्तरि॑क्षे। ये। दि॒वि। तेभ्यः॑। स॒र्पेभ्यः॑। नमः॑ ॥६ ॥

Mantra without Swara
नमो स्तु सर्पेभ्यो ये के च पृथिवीमनु । येऽअन्तरिक्षे ये दिवि तेभ्यः सर्पेभ्यो नमः ॥

नमः। अस्तु। सर्पेभ्यः। ये। के। च। पृथिवीम्। अनु। ये। अन्तरिक्षे। ये। दिवि। तेभ्यः। सर्पेभ्यः। नमः॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ : या जगात जे जेवढे (के) लोक लोकांतर आणि प्राणी आहेत, (तेभ्य:) (सर्पेभ्य:) त्या लोकांतील प्राण्यांसाठी (नम:) अन्न, (भोजनादी) (अस्तु) असो (आम्ही ईश्‍वरोपासक सर्वांसाठी परमेश्‍वराकडे ही प्रार्थना करीत आहोत) तसेच या (अंतरिक्षे) आकाशात (ये) जे प्राणी आहेत, (दिवि) प्रकाशमान सूर्य आदी लोकांमध्ये (ये) जे प्राणी आहेत (च) आणि (पृथिवीम्‌) (अनु) भूमीवर जे चालतात, त्या सर्व (सर्पेभ्य:) प्राण्यांसाठी (नम:) अन्न प्राप्त होवो (आम्ही अशी कामना व्यक्त करीत आहोत) ॥6॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, (तुम्ही हे जाणून घ्या की जेवढे लोक (गृह, नक्षत्रादी) डोळ्यांना दिसतात, आणि जे ग्रह नक्षत्रादी अतिदूरत्वामुळे दिसत नाहीत, ते सर्व लोकलोकांतर आपापल्या भ्रमणकक्षेत (नियमबद्धरीतीने आकाशमार्गात भ्रमण करतात. त्या सर्व लोकलोकांतरात जे प्राणी आहेत, परमेश्‍वराने त्यांच्याकरिता देखील अन्न-भोजनादीची व्यवस्था केलेली आहे. यामुळेच त्या प्राण्यांचे जीवन व अस्तित्व आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी नीट जाणून घ्यावी. ॥6॥
Subject
मनुष्यांनी जगात कसे वागावे (आचरण कसे असावे) याविषयी पुढील मंत्रात प्रतिपादन केले आहे-
Footnote
(टीप : नम- या शब्दाचा एक अर्थ अन्नदेखील आहे. त्यासाठी प्रमाण निघंटुशण तसेच सर्प या शब्दाचा अर्थ-ये सर्पन्ति गच्छन्ति ते लोका: म्हणजे लोक अर्थात्‌ ‘भ्रमण करणारे ते ग्रह नक्षत्रादी’ असाही अर्थ आहे. त्यात प्रमाण शतपथ ब्राह्मण 7/3/1/25॥- वरील दोन प्रमाण महर्षिदयानंदाचा संस्कृत वेदभाष्यावरून मंत्रार्थाच्या स्पष्टतेकरिता विशेषत्वाने दिले आहेत) ॥