Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 52

58 Mantra
13/52
Devata- अग्निर्देवता Rishi- उशना ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
त्वं य॑विष्ठ दा॒शुषो॒ नॄः पा॑हि शृणु॒धी गिरः॑। रक्षा॑ तो॒कमु॒त त्मना॑॥५२॥

त्वम्। य॒वि॒ष्ठ॒। दा॒शुषः॑। नॄन्। पा॒हि॒। शृ॒णु॒धि। गिरः॑। रक्ष॑। तो॒कम्। उ॒त। त्मना॑ ॥५२ ॥

Mantra without Swara
त्वँयविष्ठ दाशुषो नऋृँ पाहि शृणुधी गिरः । रक्षा तोकमुत त्मना ॥

त्वम्। यविष्ठ। दाशुषः। नॄन्। पाहि। शृणुधि। गिरः। रक्ष। तोकम्। उत। त्मना॥५२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन राजाला उद्देशून म्हणत आहे) हे (यविष्ठ) अत्यंत तरूण, पूर्ण युवा राजा, (त्वम्‌) आपण या (वरील चार मंत्रात उल्लेखिलेल्या पशूंचे) रक्षण करून त्या पशूंद्वारे (दाशुष:) इतरांना सुख देणाऱ्या आणि (नृन्‌) धर्मरक्षक मनुष्यांची (पाहि) रक्षा करा (त्यांना संकट, आक्रमण आदीपासून वाचवा) आमच्या (गिर:) प्रार्थना (वा निवेदन) शृणुधि) ऐका आणि (त्मना) अंत:करणापासून (मनापासून) या मनुष्यांची (उत्‌) आणि (तोकम्‌) मुलाबाळांची (रक्ष) रक्षा करा ॥52॥
Essence
भावार्थ - जी माणसें मनुष्य आदी प्राण्यांचे रक्षण करणाऱ्या पशूंचे (पालन, वृद्धी, संवर्धन) करतात आणि कृपापूर्ण उपदेश ऐकतात न सांगतात, ती-माणसें आंतरिक व सत्य सुखाचे स्वामी होतात ॥52॥
Subject
कोणत्या प्रकारचे पशू रक्षणीय आहेत आणि कोणते वध्य आहेत, पुढील मंत्रात याविषयी वर्णन केले आहे -