Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 51

58 Mantra
13/51
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- भुरिक्कृतिः Swara- निषादः
Mantra with Swara
अ॒जो ह्य॒ग्नेरज॑निष्ट॒ शोका॒त् सोऽ अ॑पश्यज्जनि॒तार॒मग्रे॑। तेन॑ दे॒वा दे॒वता॒मग्र॑मायँ॒स्तेन॒ रोह॑माय॒न्नुप॒ मेध्या॑सः। श॒र॒भमा॑र॒ण्यमनु॑ ते दिशामि॒ तेन॑ चिन्वा॒नस्त॒न्वो निषी॑द। श॒र॒भं ते॒ शुगृ॑च्छतु॒ यं द्वि॒ष्मस्तं ते॒ शुगृ॑च्छतु॥५१॥

अ॒जः। हि। अ॒ग्नेः। अज॑निष्ट। शोका॑त्। सः। अ॒प॒श्य॒त्। ज॒नि॒तार॑म्। अग्रे॑। तेन॑। दे॒वाः। दे॒वता॑म्। अग्र॑म्। आ॒य॒न्। तेन॑। रोह॑म्। आ॒य॒न्। उप॑। मेध्या॑सः। श॒र॒भम्। आ॒र॒ण्यम्। अनु॑। ते॒। दि॒शा॒मि॒। तेन॑। चि॒न्वा॒नः। त॒न्वः᳖। नि। सी॒द॒। श॒र॒भम्। ते॒। शुक्। ऋ॒च्छ॒तु॒। यम्। द्वि॒ष्मः। तम्। ते॒। शुक्। ऋ॒च्छ॒तु॒ ॥५१ ॥

Mantra without Swara
अजो ह्यग्नेरजनिष्ट शोकात्सोऽअपश्यज्जनितारमग्रे । तेन देवा देवतामग्रमायँस्तेन रोहमायन्नुप मेध्यासः । शरभमारण्यमनु ते दिशामि तेन चिन्वानस्तन्वो नि षीद । शरभन्ते शुगृच्छतु यन्द्विष्मस्तन्ते शुगृच्छतु ॥

अजः। हि। अग्नेः। अजनिष्ट। शोकात्। सः। अपश्यत्। जनितारम्। अग्रे। तेन। देवाः। देवताम्। अग्रम्। आयन्। तेन। रोहम्। आयन्। उप। मेध्यासः। शरभम्। आरण्यम्। अनु। ते। दिशामि। तेन। चिन्वानः। तन्वः। नि। सीद। शरभम्। ते। शुक्। ऋच्छतु। यम्। द्विष्मः। तम्। ते। शुक्। ऋच्छतु॥५१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजा, (हि) निश्‍चित आहे की (अज:) बकरा (अजनिष्ट जेव्हां उत्पन्न होतो, तेव्हां (स:) पो (अग्रे) पाहिले आपल्या (जनितारम्‌) उत्पादकता, (आईला) (अपश्‍यत्य) पाहतो. (त्याप्रमाणे विद्वान लोक उत्पादकाचा (परमेश्‍वराला सर्वप्रथम ध्यान करतात. त्या ध्यानाने) (मेध्यास:) पवित्र झालेले (देवा:) विद्वज्जन (अग्रम्‌) उत्कृष्ट सुख आणि (देवताम्‌) दिव्य गुण (उपायम्‌) प्राप्त करतात आणि त्या दिव्यगुणांनी (रोहम्‌) त्यांना उन्नती आणि यश (आयन्‌) प्राप्त व्हावे (वा होते) (तेन) त्या सद्गुणांनी विद्वानांना उत्तम सुख प्राप्त होते आणि (तेन) त्यामुळे त्यांची सतत प्रगती होत जाते. (हे राजन्‌, तुझ्या राज्यात) हे (आरण्यम्‌) वन्य जीव (शरभम्‌) सावाळ (उंदीर, घुस आदी विनाशक प्राणी) की जे (ते) तुझ्या प्रजेला त्रास देतात, त्या प्राण्यांविषयी तुला माहिती आणि त्यांच्या नाशाविषयी (अनुदिशामि) आदेश देत आहे. (तेन) त्या प्राण्यापासून वाचवून जे धान्यादी पदार्थ शेष राहतात, त्यांनी तू (चिन्वीन:) वृद्धी वा प्रगती करीत रहा. आणि (तन्व:) आपल्या स्वस्थ नीरोग शरीरासह (निषीद) निवांत रहा. तसेच (तम्‌) त्या (शरभम्‌) सायकाला (उंदीर, घूस, कीटक आदी पीकनाशक प्राणी) (ते) तुझा (शुक्‌) शोक (ऋच्छतु) प्राप्त होवो. (ते प्राणी दुखी वा नष्ट व्हावेत) याशिवाय (ते) तुझ्या (यम्‌) ज्या शत्रूचा आम्ही (प्रजाजन) (द्विष्म:) द्वेष करतो, त्याला तून आपल्या (शोकात्‌) (अग्ने:) शोक (वा क्रोध) रुप अग्नीने (जाळून टाक) म्हणजे तो शत्रू शोकग्रस्त अथवा अति शोकग्रस्त (ऋच्छतु) होवो (अशी आमची इच्छा आहे) ॥51॥
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी हे उचित आहे की, बकरा, मोर आदी पुश-पक्ष्यांची हत्या करू नये-उलट त्यांचे रक्षण-पालन करून सर्वांच्या उपकारांकरिता उपयोगात आणावेत. जे दुष्टजन चांगल्या हितकर पशु-पक्ष्यांची हत्या करीत असतील, त्यांची शीघ्र दंडित करावे. मात्र शेतीचा नाश करणारे जे सपाळ आदी प्राणी आहेत, प्रजेच्या हितासाठी त्या प्राण्यांना मारायला हरकत नाही. ॥51॥
Subject
कोणत्या प्रकारच्या पशूंचा नाश योग्य आहे आणि कोणत्या प्रकारचे पशू अवधान आहे, पुढील मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे -