Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 5

58 Mantra
13/5
Devata- ईश्वरो देवता Rishi- हिरण्यगर्भ ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
द्र॒प्सश्च॑स्कन्द पृथि॒वीमनु॒ द्यामि॒मं च॒ योनि॒मनु॒ यश्च॒ पूर्वः॑। स॒मा॒नं योनि॒मनु॑ सं॒चर॑न्तं द्र॒प्सं जु॑हो॒म्यनु॑ स॒प्त होत्राः॑॥५॥

द्र॒प्सः। च॒स्क॒न्द॒। पृ॒थि॒वीम्। अनु॑। द्याम्। इ॒मम्। च॒। योनि॑म्। अनु॑। यः। च॒। पूर्वः॑। स॒मा॒नम्। योनि॑म्। अनु॑। सं॒चर॑न्त॒मिति॑ स॒म्ऽचर॑न्तम्। द्र॒प्सम्। जु॒हो॒मि। अनु॑। स॒प्त। होत्राः॑ ॥५ ॥

Mantra without Swara
द्रप्सश्चस्कन्द पृथिवीमनु द्यामिमञ्च योनिमनु यश्च पूर्वः । समानँयोनिमनु सञ्चरन्तन्द्रप्सञ्जुहोम्यनु सप्त होत्राः ॥

द्रप्सः। चस्कन्द। पृथिवीम्। अनु। द्याम्। इमम्। च। योनिम्। अनु। यः। च। पूर्वः। समानम्। योनिम्। अनु। संचरन्तमिति सम्ऽचरन्तम्। द्रप्सम्। जुहोमि। अनु। सप्त। होत्राः॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ- (योगाभ्यासाद्वारे ईश्‍वरीय ब्रह्मानंद अनुभवणारा एक योगी साधक वा उपासक सर्वांना म्हणत आहे) हे मनुष्यांनो, मी आपल्या (सप्त) पंचप्राण, मन आणि आत्मा या सात साधनांद्वारे (होता:) तो परमानंद ग्रहण करीत आहे (वा अनुभवीत आहे (य:) सच्चिदानंद स्वरूप त्या परमेश्‍वराचा तो आनंद) (श्‍याम्‌) या (पृथिवीम्‌) पृथ्वीला (द्याम्‌) प्रकाशलोकाला (च) आणि (योनिम्‌) प्रत्येक स्थानाला व्यापून असून (पूर्व:) तो संपूर्णपणे (द्रप्स:) आनंद आणि उत्साहाची (अनु) साधकाला अनुकूलतेने (चस्कन्द) प्राप्ती करून देतो. त्या आनंदाच्या (योनिम्‌) मूळ कारणाला परमेश्‍वराला (अनु) आणि त्याच्या (संचरातम्‌) सर्वत्र संचरण करणाऱ्या आणि सर्वत्र (समानम्‌) समानरुपेण व्याप्त अशा (द्रप्सम्‌) आनंदाला मी (एक योगी साधक) (अनुजुहोमि) अनुकूल करून घेत आहे. (आनंद अनुभवतो), माझ्याप्रमाणे तुम्ही सर्व माणसांनी देखील त्या परमानंदाचा अनुभव घेतला पाहिजे. ॥5॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यहो, तुम्हांस पाहिजे की ज्या जगदीश्‍वराच्या आनंदाचा लाभ सर्वत्र घेता येतो, तसेच ज्याच्या स्वरूपाचा अनुभवही घेता येतो, त्या अगदीश्‍वराच्या आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी तुम्ही योगाभ्यास करा. ॥5॥
Subject
पुनश्‍च पुढील मंत्रात देखील तोच विषय (ईश्‍वरोपासना) वर्णित आहे -