Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 46

58 Mantra
13/46
Devata- सूर्यो देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
चि॒त्रं दे॒वाना॒मुद॑गा॒दनी॑कं॒ चक्षु॑र्मि॒त्रस्य॒ वरु॑णस्या॒ग्नेः। आ प्रा॒ द्यावा॑पृथि॒वीऽ अ॒न्तरि॑क्ष॒ꣳ सूर्य्य॑ऽ आ॒त्मा जग॑तस्त॒स्थुष॑श्च॥४६॥

चि॒त्रम्। दे॒वाना॑म्। उत्। अ॒गा॒त्। अनी॑कम्। चक्षुः॑। मि॒त्रस्य॑। वरु॑णस्य। अ॒ग्नेः। आ। अ॒प्राः॒। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। अ॒न्तरि॑क्षम्। सूर्य्यः॑। आ॒त्मा। जग॑तः। त॒स्थुषः॑। च॒ ॥४६ ॥

Mantra without Swara
चित्रन्देवानामुदगादनीकञ्चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्नेः । आप्रा द्यावापृथिवी अन्तरिक्षँ सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च ॥

चित्रम्। देवानाम्। उत्। अगात्। अनीकम्। चक्षुः। मित्रस्य। वरुणस्य। अग्नेः। आ। अप्राः। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। अन्तरिक्षम्। सूर्य्यः। आत्मा। जगतः। तस्थुषः। च॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (मनुष्यांना उपदेश केला आहे) हे मनुष्यांनो, तुम्ही त्या जगदीश्‍वराची उपासना करा की जो (देवानाय्‌) पृथ्वी आदी दिव्य पदार्थांमध्ये व्याप्त आहे, जो (चित्रम्‌) अद्भुत व अनाकलनीय आहे. (अनीकम्‌) सूर्य जसा आपल्या किरणें रुप सैन्याने वेढलेला असतो, सूर्य जसा (मित्रस्य) प्राण (वरूणस्य) उदान आणि (अग्ने:) भौतिक अग्नी यांना (चक्षु:) दर्शविणारा (पाहण्याचे साधन असलेला) असून (उद्गात्‌) आकाशात उदित होतो, तद्वत जगदीश्‍वर सर्वत्र असून त्याच्यामुळेच मनुष्य सर्व पदार्थ पाहू शकतात. तोच परमेश्‍वर (जगत:) गतिशीलतेमध्ये पदार्थांमधे (च) आणि (तस्थुष:) जड पदार्थांमधे (आत्मा) अंतर्यामी आहे. तोच (द्यावा पृथिवी) प्रकाशमान जगतात त्वा आणि अंधकारमय जगताला आणि (अंतरिक्षम्‌) आकाशाला (आ) चांगल्याप्रकारे (आ प्रा) व्यापून राहिला आहे, जगाची रचना, पालन आणि संहार म्हणजे प्रलय करणाऱ्या त्या व्यापक ब्रह्माची, हे मनुष्यांनो, तुम्ही निरंत व सदैव उपासना करीत जा ॥46॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. असे मुळीच नाही की या जगाचा कोणी कर्ता, अधिष्ठाता अथवा ईश्‍वर नाही. (जगाची रचना करणारा, पालन वा नियमन करणारा ईश्‍वर अवश्‍य आहे) तो ईश्‍वर सर्वांच्या अंतरी अंतर्मायी असून सर्व प्राण्यांच्या (मनुष्यांच्या) पापकर्म आणि पुण्य कर्मांचे फळ देणारा आणि अनंत ज्ञानाचा भांडार असून ज्ञानप्रकाश करणारा आहे. त्याची उपासना करून सर्व मनुष्यांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची सिद्धी करून घ्यावी (हेच सर्वांच्या कल्याणाचे आहे) ॥46॥
Subject
ईश्‍वर कसा आहे, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे-