Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 44

58 Mantra
13/44
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
वरू॑त्रीं॒ त्वष्टु॒र्वरु॑णस्य॒ नाभि॒मविं॑ जज्ञा॒ना रज॑सः॒ पर॑स्मात्। म॒ही सा॑ह॒स्रीमसु॑रस्य मा॒यामग्ने॒ मा हि॑ꣳसीः पर॒मे व्यो॑मन्॥४४॥

वरू॑त्रीम्। त्वष्टुः॑। वरु॑णस्य। नाभि॑म्। अवि॑म्। ज॒ज्ञा॒नाम्। रज॑सः। पर॑स्मात्। म॒हीम्। सा॒ह॒स्रीम्। असु॑रस्य। मा॒याम्। अग्ने॑। मा। हि॒ꣳसीः॒। प॒र॒मे। व्यो॑मन्निति॒ विऽओ॑मन् ॥४४ ॥

Mantra without Swara
वरूत्रीन्त्वष्टुर्वरुणस्य नाभिमविञ्जज्ञानाँ रजसः परस्मात् । महीँ साहस्रीमसुरस्य मायामग्ने मा हिँसीः पर्मे व्योमन् ॥

वरूत्रीम्। त्वष्टुः। वरुणस्य। नाभिम्। अविम्। जज्ञानाम्। रजसः। परस्मात्। महीम्। साहस्रीम्। असुरस्य। मायाम्। अग्ने। मा। हिꣳसीः। परमे। व्योमन्निति विऽओमन्॥४४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान महादेव, (अथवा जगातील सर्व ज्ञानी मनुष्यांनो) या सृष्टीत (त्वष्टु:) छेदन-भेदन गुण युक्त सूर्याच्या (वरूत्रीम्‌) ग्रहण करण्यास उचित (अशा गुणांचे आपण रक्षण करा, स्वीकार करा) (वरूणस्य) जलामधे असलेल्या (नाभिम्‌) बंधन नाम गुणांचा तसेच (परस्मात्‌) (रजस:) श्रेष्ठ लोकापासून (जजानाम्‌) उत्पन्न झालेली आणि (असुरस्य) मेघाचे (आयाम्‌) ज्ञान करून देणाऱ्या विद्युतेला आपण जाणून घ्या. (त्यांच्या उपयोगाचे ज्ञान मिळवा) (साहस्रीम्‌) अगणित गोल-भूगोल यांच्यापासून मिळणाऱ्या लाभांची प्राप्ती करून देणारी (अविम्‌) आमचे रक्षण करणारी आणि (परमे) (न्योमन्‌) सर्वोत्तम आकाशमानाप्रमाणे सर्वत्र व्याप्त परमेश्‍वरामधे विद्यमान असा या (महीम्‌) विशाल पृथ्वीला (मा) (हिंसी:) नष्ट करू नका (विद्युत जलामध्ये ढगामध्ये असून पृथ्वीला तिची प्राप्ती अन्य ग्रह-नक्षत्रादीमुळे होते आणि पृथ्वीचे उपग्रह आदी आहेत, या दोन गोष्टींची माहिती या मंत्रात करून दिली आहे) ॥44॥
Essence
भावार्थ - सर्व मनुष्यांनी हे जाणून घ्यावे की ही पृथ्वी उत्तम कारणापासून उत्पन्न झालेली असून सूर्याच्या आकर्षणाने बद्ध आहे. तसेच पाण्याचा आधार जो मेथ, त्या मेधाच्या उत्पत्तीचे कारण असून परमेश्‍वराने ही पृथ्वी असंघ्य लाभ, गुण देणारी अशी निर्मिती आहे. सर्वांनी या अशा पृथ्वीने गुण, कर्म आणि स्वभाव जाणून घ्यावेत आणि सुख प्राप्त करण्यासाठी पृथ्वीचा (पृथ्वीवरील पदार्थांच्या) उपयोग करावा ॥44॥
Subject
आता त्या विद्वानाने काय करू नयेत हे पुढील मंत्रात सांगितले आहे-