Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 42

58 Mantra
13/42
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
वात॑स्य जू॒तिं वरु॑णस्य॒ नाभि॒मश्वं॑ जज्ञा॒नꣳ स॑रि॒रस्य॒ मध्ये॑। शिशुं॑ न॒दीना॒ हरि॒मद्रि॑बुध्न॒मग्ने॒ मा हि॑ꣳसीः पर॒मे व्यो॑मन्॥४२॥

वात॑स्य। जू॒तिम्। वरु॑णस्य। नाभि॑म्। अश्व॑म्। ज॒ज्ञा॒नम्। स॒रि॒रस्य॑। मध्ये॑। शिशु॑म्। न॒दीना॑म्। हरि॑म्। अद्रि॑बुध्न॒मित्यद्रि॑बुध्नम्। अग्ने॑। मा। हि॒ꣳसीः॒। प॒र॒मे। व्यो॑म॒न्निति॒ विऽओ॑मन् ॥४२ ॥

Mantra without Swara
वातस्य जूतिँवरुणस्य नाभिमश्वञ्जज्ञानँ सरिरस्य मध्ये । शिशुन्नदीनाँ हरिमद्रिबुध्नमग्ने मा हिँसीः परमे व्योमन् ॥

वातस्य। जूतिम्। वरुणस्य। नाभिम्। अश्वम्। जज्ञानम्। सरिरस्य। मध्ये। शिशुम्। नदीनाम्। हरिम्। अद्रिबुध्नमित्यद्रिबुध्नम्। अग्ने। मा। हिꣳसीः। परमे। व्योमन्निति विऽओमन्॥४२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने तेजस्वी विद्वान (वैज्ञानिक) महोदय, या (परमेन्योमन्‌) सर्वत्र व्याप्त अशा आकाशात (वातस्य) (मध्ये) वायूमध्ये जो (जूतिम्‌) वेगरूप (अश्‍वम्‌) घोड़ा आहे, (त्यासी हानी होऊ देऊ नका, वायू व आमच्यासाठी उपकारक राहील, असे यत्न करा) तसेच (सरिरस्य) पाण्यामधे बंधन (पालन, जोडणे आदी) जे गुण आहेत आणि (नदीनाम्‌) नद्यांचा जो हितकर उपयोग योग्य वापरू आहे, त्याला (जज्ञानम्‌) जाणा (नदीजलापासून अधिकाधिक उपयोग कसा घेता येईल, ते शोधा) (शिशुम्‌) एखाद्या बालकाप्रमाणे जो (हरिम्‌) निळ्या रंगाचा (अद्रिबुध्नम्‌) सूक्ष्मरुप --- (निळ्या रुपात दिसणारे सूक्ष्म कण) आहे, त्याला (मा) (हिंसी:) नष्ट करूं नका. (मेधवृष्टी नियमित आणि पुष्कळ होत राहील, असे यत्न करा) ॥42॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांसाठी हे उचित आहे की त्यानी प्रमाद त्यागा आणि आकाशात विद्यमान वायुच्या वेगाचा (प्रवाहाचा) आणि जलवृष्टी करणाऱ्या मेघाचा कधीही विनाश करू नये. याप्रकारे परिस्थितीत उन्नती घडवून आणावी. ॥42॥
Subject
विद्वान मनुष्यांने काम करावे, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -