Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 39

58 Mantra
13/39
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- निचृदबृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
ऋ॒चे त्वा॑ रु॒चे त्वा॑ भा॒से त्वा॒ ज्योति॑षे त्वा। अभू॑दि॒दं विश्व॑स्य॒ भुव॑नस्य॒ वाजि॑नम॒ग्नेर्वै॑श्वान॒रस्य॑ च॥३९॥

ऋ॒चे। त्वा॒। रु॒चे। त्वा॒। भा॒से। त्वा॒। ज्योति॑षे। त्वा॒। अभू॑त्। इ॒दम्। विश्व॑स्य। भुव॑नस्य। वाजि॑नम्। अ॒ग्नेः। वै॒श्वा॒न॒रस्य॑। च॒ ॥३९ ॥

Mantra without Swara
ऋचे त्वा रुचे त्वा भासे त्वा ज्योतिषे त्वा । अभूदिदँविश्वस्य भुवनस्य वाजिनमग्नेर्वैश्वानरस्य च ॥

ऋचे। त्वा। रुचे। त्वा। भासे। त्वा। ज्योतिषे। त्वा। अभूत्। इदम्। विश्वस्य। भुवनस्य। वाजिनम्। अग्नेः। वैश्वानरस्य। च॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान महोदय, तुम्ही (विश्‍वस्थ) संपूर्ण (भुवनस्म) जगातील सर्व पदार्थांचे आणि (वैश्‍वानरस्य) सर्व मनुष्यांना प्रकाश आणि लाभ देणाऱ्या (अग्ने:) विद्युतरुप अग्नीच्या (वाजिनम्‌) शक्तिदायी अशा (इदम्‌) या विज्ञानाला (अभूत्‌) जाणता (आपण सर्व पदार्थांच्या उपयोगाचे उचित ज्ञान मिळविले आहे) हे ज्ञान (ऋचे) प्राप्त करण्यासाठी वा त्याचे गुण जाणण्यासाठी आम्ही (त्वा) तुमच्या आश्रयास येतो. (सचे) त्या ज्ञाना विषयी असलेल्या प्रेमापोटी (त्वा) तुमच्या आणि (भासे) त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आम्ही (त्वा) तुमच्या आश्रयास येतो. तसेच (ज्योतिषे) न्याय्य व सत्य जागण्यासाठी आम्ही (त्वा) तुमचा आश्रय घेतो (तुमच्याजवळ येतो. तुम्ही आम्हा सामान्यज्ञानी असलेल्या लोकांना सर्व पदार्थांचे विशेष ज्ञान शिकवा) ॥39॥
Essence
भावार्थ - ज्या मनुष्यांना (शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, वैद्य आदी लोकांना (शोध, प्रयोग आदी द्वारा) जगातील पदार्थांचा बोध, विशेषज्ञान प्राप्त झालेले असेल, ती पदार्थ विद्या (भौतिकशास्त्र) विद्वानांनी सर्व मनुष्यांना सांगावी ॥39॥
Subject
(विद्वज्जनांहून वेगळ्या (म्हणजे सामान्य ज्ञान असलेल्या) मनुष्यांनी विद्वानांकडून ज्ञान ग्रहण केले पाहिजे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे-