Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 38

58 Mantra
13/38
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
स॒म्यक् स्र॑वन्ति स॒रितो॒ न धेना॑ऽ अ॒न्तर्हृ॒दा मन॑सा पू॒यमा॑नाः। घृ॒तस्य॒ धारा॑ऽ अ॒भिचा॑कशीमि हिर॒ण्ययो॑ वेत॒सो मध्ये॑ऽ अ॒ग्नेः॥३८॥

स॒म्यक्। स्र॒व॒न्ति॒। स॒रितः॑। न। धेनाः॑। अ॒न्तः। हृ॒दा। मन॑सा। पू॒यमा॑नाः। घृ॒तस्य॑। धाराः॑। अ॒भि। चा॒क॒शी॒मि॒। हि॒र॒ण्ययः॑। वे॒त॒सः। मध्ये॑। अ॒ग्नेः ॥३८ ॥

Mantra without Swara
सम्यक्स्रवन्ति सरितो न धेनाऽअन्तर्हृदा मनसा पूयमानाः । घृतस्य धारा अभि चाकशीमि हिरण्ययो वेतसो मध्येऽअग्नेः ॥

सम्यक्। स्रवन्ति। सरितः। न। धेनाः। अन्तः। हृदा। मनसा। पूयमानाः। घृतस्य। धाराः। अभि। चाकशीमि। हिरण्ययः। वेतसः। मध्ये। अग्नेः॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - मधुरभाषी विद्वान वक्ता म्हणत आहे) माणसांनो, (अग्ने:) विद्युतेमध्ये असलेल्या (हिरण्यथ:) तेजाप्रमाणे तेजस्वी आणि यथोमंत होऊ इच्छिणारा तसेच विद्याप्राप्तीची कामना करणारा मी (घृतस्य) जलाच्या (वेतस:) वेगवती (धारा:) धारेप्रमाणे आणि (सरित:) न द्या (न) प्रमाणे (पवित्र वाणी सर्वांसाठी शीघ्र प्रकट करतो वा सर्वांना शिकवितो) (हृदा) याशिवाय अन्त:करणा (अन्त:) मध्ये (मनसा) विज्ञानरुप मनाने (पूयमाना:) पवित्र झालेली (धेना:) वाणी (वेदवाणी ना सुविचार) सम्यव्ह) सम्यकप्रकारे (स्रर्वान्त) वाहतात (मनात जे सुंदर हितकारी विचार येतात) हे विचार कमी (अभिचाकशी मी) सर्वांकरिता प्रकट करतो (सर्वांना सांगतो) तुम्ही सर्वजण देखील माझ्या त्या हितकारी वचनांना लक्ष देऊन ऐका (आणि त्याप्रमाणे आचरण करा) ॥38॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमालंकार आहे (एकूण तीन उपमा दिल्या आहेत. उपमेथ आहेत - अंत: करणातील सुंदर हितकारी विचार आणि तीन उपमात आहेत 1) विद्युतेतील तेज, 2) वेगवती धारा आणि 3) पवित्र नदी, (न) शब्द वाचक शब्द आहे आणि साधारण धर्म आहे- (स्रवन्ति) वाहणे, प्रवाहित होणे, अशा प्रकारे काव्यदृष्ट्या हा मंत्र एक सुंदर ‘पूर्णोपमा’ अलंकार आहे की ज्यामध्ये उपमा अलंकाराच्या चारही अंगांचा उपयोग केला आहे.) सर्व मनुष्यांसाठी उचित आहे की ज्याप्रमाणे पाण्याने अधिक वा कमी भरलेल्या, वाहणाऱ्या शुद्ध झालेल्या नद्या शेवटी सागराला मिळतात व स्थिर होतात, त्याप्रमाणे (विद्वान लोकांनी) विद्या, शिक्षण आणि धर्म यांनी पवित्र झालेली सत्य वाणी स्वत: प्राप्त करावी आणि इतरांनाही ती शिकवावी.॥38॥
Subject
माणसांनी कसे असावे आणि वाणीचा प्रयोग कसा करावा, याविषयी पुढील मंत्रात प्रतिपादन केले आहे-