Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 33

58 Mantra
13/33
Devata- विष्णुर्देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे। इन्द्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑॥३३॥

विष्णोः॑। कर्मा॑णि। प॒श्य॒त॒। यतः॑। व्र॒तानि॑। प॒स्प॒शे। इन्द्र॑स्य। युज्यः॑। सखा॑ ॥३३ ॥

Mantra without Swara
विष्णोः कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे । इन्द्रस्य युज्यः सखा ॥

विष्णोः। कर्माणि। पश्यत। यतः। व्रतानि। पस्पशे। इन्द्रस्य। युज्यः। सखा॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (तुम्ही पहा की हा जो) (इन्द्रस्य) ऐश्‍वर्याचा इच्छुक विद्वान मनुष्‌य (युज्य:) उपासनीय परमेश्‍वराचा (सखा) मित्राप्रमाणे आहे (परमेश्‍वराचा उपासक असून सतत त्याच्या संगतीत, ध्यानात असतो) आणि (यत:) ज्या परमेश्‍वराच्या प्रतापामुळे हा मनुष्य (विष्णो:) सर्वव्यापी परमेश्‍वराच्या (कर्माणि) सृष्टीची रचना, पालन आणि प्रलय करणे आणि (जीवांच्या कर्मफळांचा) न्यायकरण आदी कर्मांना जाणतो आणि त्यानुसार (व्रर्तान) स्वत: सत्यभाषण, सद्व्यवहार आदी नियमांचा (पस्पशे) स्पर्श करतो (त्या व्रतांचे पालन करतो). हे मनुष्यांनो, तुम्ही सर्व जणदेखील त्या ईश्‍वरीय कर्म आणि मानवीय आचार -व्यवहारांकडे (पश्‍यत) पहा, लक्ष द्या. (तो उपासक ज्याप्रमाणे ईश्‍वराची उपासना करतो आणि ज्या ज्या नियमांचे पालन करतो, तुम्हीही त्याप्रमाणे करा) ॥33॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे परमेश्‍वराचा मित्र असलेला एक उपासक विद्वान मनुष्य परमात्म्याच्या गुण, कर्म आणि स्वभाव यांनुसार आणि सृष्टीच्या नियमांनुकूल आचरण करतो, आणि त्याविषयी पूर्ण ज्ञानी असतो, तद्वत अन्य मनुष्यांनीदेखील करावे आणि जाणावे. ॥33॥
Subject
सर्वांना विद्वानांप्रमाणे (ते करीत असल्याप्रमाणे) आचरण करावे, पुढील मंत्रात हा विषय वर्णिला आहे-