Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 32

58 Mantra
13/32
Devata- द्यावापृथिव्यौ देवते Rishi- गोतम ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
म॒ही द्यौः पृ॑थि॒वी च॑ नऽ इ॒मं य॒ज्ञं मि॑मिक्षताम्। पि॒पृ॒तां नो॒ भरी॑मभिः॥३२॥

म॒ही। द्यौः। पृ॒थि॒वी। च॒। नः॒। इ॒मम्। य॒ज्ञम्। मि॒मि॒क्ष॒ता॒म्। पि॒पृ॒ताम्। नः॒। भरी॑मभि॒रिति॒ भरी॑मऽभिः ॥३२ ॥

Mantra without Swara
मही द्यौः पृथिवी च न इमँ यज्ञं मिमिक्षताम् । पिपृतान्नो भरीमभिः ॥

मही। द्यौः। पृथिवी। च। नः। इमम्। यज्ञम्। मिमिक्षताम्। पिपृताम्। नः। भरीमभिरिति भरीमऽभिः॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे माता, हे पिता, ज्याप्रमाणे (मही) महान्‌ (द्यौ:) सूर्य लोक (च) आणि (पृथिवी) भूमी साऱ्या जगाला सिंचित वा पालित करतात, त्याप्रमाणे तुम्ही दोघे (न:) आमच्या (इमम्‌) षा (यज्ञम्‌) विद्याग्रहणरुप कार्याला (मिमिक्षताम्‌) पूर्ण करण्याची इच्छा आणि यत्न करा (आम्हा तुमच्या मुलामुलींना शिक्षण आणि आचार शिकवा वा शिकविण्याची व्यवस्था करा) आणि (भरीमनि:) आमचे आवश्‍यक पदार्थ देऊन (न:) आमचे (पितृताम्‌) पालन-पोषण करा ॥32॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे सूर्य आणि पृथ्वी वसंत ऋतूत सर्व जगाचे धारण, पालन करतात आणि जगाला प्रकाशित करतात, त्याचप्रमाणे आई-वडिलांचे कर्तव्य आहे की आपल्या संतानांला वसंत आदी सर्व ऋतूत आवश्‍यक ते अन्नादी पदार्थ देऊन, विद्यादानाची व्यवस्था करून त्यांना पूर्ण विद्वान आणि पुरुषार्थी बनवावे. ॥32॥
Subject
आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलींना कशाप्रकारचे शिक्षण द्यावे (वा आचार शिकवावेत) पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -