Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 3

58 Mantra
13/3
Devata- आदित्यो देवता Rishi- वत्सार ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
ब्रह्म॑ जज्ञा॒नं प्र॑थ॒मं पु॒रस्ता॒द्वि सी॑म॒तः सु॒रुचो॑ वे॒नऽआ॑वः। स बु॒ध्न्याऽ उप॒माऽ अ॑स्य वि॒ष्ठाः स॒तश्च॒ योनि॒मस॑तश्च॒ वि वः॑॥३॥

ब्रह्म॑। ज॒ज्ञा॒नम्। प्र॒थ॒मम्। पु॒रस्ता॑त्। वि। सी॒म॒तः। सु॒रुच॒ इति॑ सु॒ऽरुचः॑। वे॒नः। आ॒व॒रित्या॑वः। सः। बु॒ध्न्याः᳖। उ॒प॒मा इत्यु॑प॒ऽमाः। अ॒स्य॒। वि॒ष्ठाः। वि॒स्था इति॑ वि॒ऽस्थाः। स॒तः। च॒। योनि॑म्। अस॑तः। च॒। वि। व॒रिति॑ वः ॥३ ॥

Mantra without Swara
ब्रह्म जज्ञानम्प्रथमम्पुरस्ताद्वि सीमतः सुरुचो वेनऽआवः । स बुध्न्याऽउपमाऽअस्य विष्ठाः सतश्च योनिमसतश्च विवः ॥

ब्रह्म। जज्ञानम्। प्रथमम्। पुरस्तात्। वि। सीमतः। सुरुच इति सुऽरुचः। वेनः। आवरित्यावः। सः। बुध्न्याः। उपमा इत्युपऽमाः। अस्य। विष्ठाः। विस्था इति विऽस्थाः। सतः। च। योनिम्। असतः। च। वि। वरिति वः॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - परमात्मा (पुरस्तात्‌) सृष्टीच्या प्रारंभ होताना (जज्ञानम्‌) सर्व जगाचा उत्पादक होता आणि सर्वज्ञानी होता व आहे, (प्रथमम्‌) तोच सृष्टीचा विस्तार करणारा आणि त्या विस्तारापेक्षा महान होता व आहे जो (ब्रह्म) सर्वांहून महान असून (सुरूच:) तोच जगातील सुंदर प्रकाशाचे आणि सौंदर्याचे कारण आहे वा जो तेजोमय आणि प्रियतम आहे, तो (वेन:) सर्वांसाठी ग्रहणीय (उपासनीय) आहे, (अस्म) त्याच्याद्वारा निर्मित (बुध्नया:) जलपूरित अंतरिक्षात सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि अनेकानेक नक्षत्रादी जे (विष्ठा:) आपापल्या विशिष्ट स्थानात (कक्षेत) स्थित आहेत, ते (उपमा:) त्या ईश्‍वराच्या अस्तित्वाचे द्योदक वा प्रत्येक उदाहरणें आहेत. त्या सर्व ग्रह-नक्षत्रांना (स:) तोच (आव:) आपल्या व्यापकत्वामुळे आच्छादित करून विद्यमान आहे. तो (बिसीमत:) आपल्या (गुण, कर्म, स्वभावाच्या) मर्यादेत विद्यमान आहे (त्या अव्यक्ताचे अस्तित्व पदार्थाच्या विद्यमानतेत पाहता येते) (च) आणि तो (असत:) अव्यक्त (च) कारण असून (योनिम्‌) आकाशरुप स्थानावत्ता (विव:) धारण वा व्याप्त करीत आहे. अशा ब्रह्माची उपासना सर्वांनी अवश्‍य केली पाहिजे. ॥3॥
Essence
भावार्थ - ज्या ब्रह्माला जाणण्यासाठी दृश्‍यमान लोक आणि अतिदूवर्ती अदृश्‍यमान लोकालोकांतर प्रत्यक्ष दृष्टांत वा साक्ष आहेत (त्या प्रत्यक्ष लोक-नक्षत्रादींना पाहून त्याची प्रचीती येते) जो सर्वत्र व्याप्त असून सर्वांचे आवरणरूप आहे, जो सर्वांना प्रकाश देतो आणि सर्व ग्रह-नक्षत्रादी लोकांना नियमत: त्या त्या कक्षेत ठेवत आहे, तोच सर्वान्तर्यामी परमात्मा सर्व मनुष्यांसाठी उपासनीय आहे. त्याच्या व्यक्तिरिक्त कोणताही पदार्थ सेवनीय वा उपासनीय नाही. ॥3॥
Subject
मनुष्यांसाठी कोणत्या स्वरूपाचे ब्रह्म (ईश्‍वर) उपासनेस योग्य आहे, पुढील मंत्रात हा विषय कथित आहे -