Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 29

58 Mantra
13/29
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- गोतम ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
मधु॑मान्नो॒ वन॒स्पति॒र्मधु॑माँ२ऽ अस्तु॒ सूर्य्यः॑। माध्वी॒र्गावो॑ भवन्तु नः॥२९॥

मधु॑मा॒निति॒ मधु॑ऽमान्। नः॒। वन॒स्पतिः॑। मधु॑मा॒निति॒ मधु॑ऽमान्। अ॒स्तु॒। सूर्य्यः॑। माध्वीः॑। गावः॑। भ॒व॒न्तु॒। नः॒ ॥२९ ॥

Mantra without Swara
मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाँ अस्तु सूर्यः । माध्वीर्गावो भवन्तु नः ॥

मधुमानिति मधुऽमान्। नः। वनस्पतिः। मधुमानिति मधुऽमान्। अस्तु। सूर्य्यः। माध्वीः। गावः। भवन्तु। नः॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सामाजिकजन म्हणतात) हे विद्वज्जनहो, ज्यायोगे हा वसंत ऋतू (न:) आम्हां (समाजातील सर्वांसाठी सुखदायी होईल), (वनस्पति:) पिंपळ आदी वृक्ष-वनस्पती (मधुमान) उत्तम सुखकर गुणांनी युक्त होतील, आणि (सूर्य्य:) सूर्यदेखील (मधुमान्‌) वांछित रुपाळ मृदु (अस्तु) राहील, आणि ज्यायोगे (न:) आमच्यासाठी सूर्याची किरणें (गाव:) गायीप्रमाणे (माध्वी) मृदु सुकोमल गुणवती (भरन्तु) होतील, हे विद्वज्जन, तुम्ही आम्हा सर्वजनांना तसा उपदेश करा (वसंतातील वनस्पती आणि सूर्यकिरणें सुखदायक होण्याची रीती आम्हाला सांगा वा पद्धती शिकवा) ॥29॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जेव्हां निसर्गात वसंत ऋतू येईल (वा असेल) तेव्हां तुम्ही, ज्या पदार्थांचा होम केल्याने (ज्या वस्तू-वनस्पतींच्या आहुतीमुळे) त्या वस्तू-वनस्पती मधुर आणि हितकर होतील, त्या वनस्पतींच्या प्रयोग करून यज्ञ करा आणि याद्वारे तुम्ही सर्वजण वसंत ऋतूपासून मिळणारे सुख अनुभवा ॥29॥
Subject
या वंसत ऋतूमध्ये माणसांनी कसे आचरण (दैनिक नित्यक्रम, कार्य आदी) करावेत, पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे-