Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 28

58 Mantra
13/28
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- गोतम ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
मधु॒ नक्त॑मु॒तोषसो॒ मधु॑म॒त् पार्थि॑व॒ꣳ रजः॑। मधु॒ द्यौर॑स्तु नः पि॒ता॥२८॥

मधु॑। नक्त॑म्। उ॒त। उ॒षसः॑। मधु॑म॒दिति॒ मधु॑ऽमत्। पार्थि॑वम्। रजः॑। मधु॑। द्यौः॑। अ॒स्तु॒। नः॒। पि॒ता ॥२८ ॥

Mantra without Swara
मधु नक्तमुतोषसो मधुमत्पार्थिवँ रजः । मधु द्यौरस्तु नः पिता ॥

मधु। नक्तम्। उत। उषसः। मधुमदिति मधुऽमत्। पार्थिवम्। रजः। मधु। द्यौः। अस्तु। नः। पिता॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (मित्रांनो) ज्यायोगे या वसंत ऋतूतील (नऋम्‌) रात्र (आम्हां सर्वांसाठी) मधु कोमल, सुखकारी होईल (उत) आणि (उळस:) उष:काळापासून आरंभ होणारा हा पूर्ण दिवस, तसेच (पार्थिवम्‌) पृथ्वीचा (रज:) द्वणुक, त्रसरेणु अर्थात कण-कण (मधुमत्‌) मधुर होईल आणि (दयौ:) सूर्य व त्याचा प्रकाश (न:) आमच्याकरिता (पिता) पित्याप्रमाणे रक्षण-पालन करणारा (अस्तु) होईल, या, आपण सर्वजण त्या रीतीने या वसंत ऋतूचे सेवन करू या. (वसंत ऋतुतील रात्र, दिवस, सूर्य, पृथ्वी या सर्वांपासून यथोचित लाभ आपण प्राप्त करू या) ॥28॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जेव्हा वसंत ऋतू येतो, (वा असतो) तेव्हां पक्षी मधुर स्वराने कुजन करतात आणि इतर सर्व प्राणीदेखील आनंदात उल्हसित असतात ॥28॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय (वसंतऋतू) कथित आहे -