Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 26

58 Mantra
13/26
Devata- क्षत्रपतिर्देवता Rishi- सविता ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अषा॑ढासि॒ सह॑माना॒ सह॒स्वारा॑तीः॒ सह॑स्व पृतनाय॒तः। स॒हस्र॑वीर्य्यासि॒ सा मा॑ जिन्व॥२६॥

अषा॑ढा। अ॒सि॒। सह॑माना। सह॑स्व। अरा॑तीः। सह॑स्व। पृ॒त॒ना॒य॒त इति॑ पृतनाऽय॒तः। स॒हस्र॑वी॒र्य्येति॑ स॒हस्र॑ऽवीर्य्या। अ॒सि॒। सा। मा॒। जि॒न्व॒ ॥२६ ॥

Mantra without Swara
अषाढासि सहमाना सहस्वारातीः सहस्व पृतनायतः । सहस्रवीर्यासि सा मा जिन्व ॥

अषाढा। असि। सहमाना। सहस्व। अरातीः। सहस्व। पृतनायत इति पृतनाऽयतः। सहस्रवीर्य्येति सहस्रऽवीर्य्या। असि। सा। मा। जिन्व॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पती पत्नीस म्हणतो) हे पत्नी, तू (अषाढा) (असि) इतकी पराक्रमी आहेस की शत्रू तुला भितात) अथवा शत्रू तुझे काही वाईट करू शकत नाहीस. पण तू पती आदी (दीर, ससुर, श्‍वश्रू) यांना (त्यांचे हितकारी उपदेश ऐकून योग्य तो आदर-मान देणारी आहेका,) म्हणून (सहस्वे) सहन कर (त्यांचा उपदेश व म्हणणे ऐक.) तू (सहस्रवीर्या) अनेक प्रकारच्या वीर कार्यात निपुण व पराक्रमी (असि आहेस. (सा) अशी तू (पृतनायर्त:) जे (अराती:) जे शत्रू आवषा होऊन तुझ्याशी युद्ध करण्यासाठी येतात (वा तुझ्या ग्राम, नगरादीवर हल्ला करतात) त्यांचा (सहस्व) समर्थपणे सामना कर. ज्याप्रमाणे मी तुला प्रसन्न ठेवतो, याप्रमाणे तू देखील (मा) मला (मी तुझा पती-मला) (जिन्व) आनंदी ठेव आणि संतृप्त कर ॥26॥
Essence
भावार्थ - दीर्घकाळापर्यंत ब्रह्मचर्य श्रमाचे पालन केलेली, अत्यंत बलवती, जितेंद्रिय, वसंत आदी ऋतूंमधील आवश्‍यक त्या कामांची जाणकार असलेली, पतीच्या चुका क्षमा करणारी, आणि शत्रूंचा (दुष्टांचा) पराभव वा निवारण करणारी, श्रेष्ठ पराक्रमी अशी जी पत्नी आपल्या पतीला (सेवादीकार्यांद्वारे) संतुष्ट व सुखी करते, त्या स्त्रीला तिचा पती देखील सदा संतुष्ट व प्रसन्न ठेवतो ॥26॥
Subject
पुढील मंत्रात, पत्नी कशी असावी, याविषयी कथन केले आहे -