Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 25

58 Mantra
13/25
Devata- ऋतवो देवताः Rishi- इन्द्राग्नी ऋषी Chhand- भुरिगतिजगती, भुरिग्ब्राही बृहती Swara- निषादः, मध्यमः
Mantra with Swara
मधु॑श्च॒ माध॑वश्च॒ वास॑न्तिकावृ॒तूऽ अ॒ग्नेर॑न्तः श्ले॒षोऽसि॒ कल्पे॑तां॒ द्यावा॑पृथि॒वी कल्॑पन्ता॒माप॒ऽ ओष॑धयः॒ कल्प॑न्ताम॒ग्नयः॒ पृथ॒ङ् मम॒ ज्यैष्ठ्या॑य॒ सव्र॑ताः। येऽ अ॒ग्नयः॒ सम॑नसोऽन्त॒रा द्यावा॑पृथि॒वीऽ इ॒मे। वास॑न्तिकावृ॒तूऽ अ॑भि॒कल्प॑माना॒ऽ इन्द्र॑मिव दे॒वाऽ अ॑भि॒संवि॑शन्तु॒ तया॑ दे॒वत॑याङ्गिर॒स्वद् ध्रु॒वे सी॑दतम्॥२५॥

मधुः॑। च॒। माध॑वः। च॒। वास॑न्तिकौ। ऋ॒तूऽइत्यृ॒तू। अ॒ग्नेः। अ॒न्तः॒श्ले॒ष इत्य॑न्तःऽश्ले॒षः। अ॒सि॒। कल्पे॑ताम्। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। कल्प॑न्ताम्। आपः॑। ओष॑धयः। कल्प॑न्ताम्। अ॒ग्नयः॑। पृथ॑क्। मम॑। ज्यैष्ठ्या॑य। सव्र॑ता इति॒ सऽव्र॑ताः। ये। अ॒ग्नयः॑। सम॑नस॒ इति॒ सऽम॑नसः। अ॒न्त॒रा। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। इ॒मेऽइती॒मे। वास॑न्तिकौ। ऋ॒तूऽइत्यृ॒तू। अ॒भि॒कल्प॑माना॒ इत्य॑भि॒ऽकल्प॑मानाः। इन्द्र॑मि॒वेतीन्द्र॑म्ऽइव। दे॒वाः। अ॒भि॒संवि॑श॒न्त्वित्य॑भि॒ऽसंवि॑शन्तु। तया॑। दे॒वत॑या। अ॒ङ्गिर॒स्वत्। ध्रु॒वेऽइति॑ ध्रु॒वे। सी॒द॒त॒म् ॥२५ ॥

Mantra without Swara
मधुश्च माधवश्च वासन्तिकावृतूऽअग्नेरन्तःश्लेषोसि कल्पेतान्द्यावापृथिवी कल्पन्तामापऽओषधयः कल्पन्तामग्नयः पृथङ्मम ज्यैष्ठ्याय सव्रताः । येऽअग्नयः समनसोन्तरा द्यावापृथिवीऽइमे वासन्तिकावृतूऽअभिकल्पमानाऽइन्द्रमिव देवा अभिसँविशन्तु तया देवतयाङ्गिरस्वद्धरुवे सीदतम् ॥

मधुः। च। माधवः। च। वासन्तिकौ। ऋतूऽइत्यृतू। अग्नेः। अन्तःश्लेष इत्यन्तःऽश्लेषः। असि। कल्पेताम्। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। कल्पन्ताम्। आपः। ओषधयः। कल्पन्ताम्। अग्नयः। पृथक्। मम। ज्यैष्ठ्याय। सव्रता इति सऽव्रताः। ये। अग्नयः। समनस इति सऽमनसः। अन्तरा। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। इमेऽइतीमे। वासन्तिकौ। ऋतूऽइत्यृतू। अभिकल्पमाना इत्यभिऽकल्पमानाः। इन्द्रमिवेतीन्द्रम्ऽइव। देवाः। अभिसंविशन्त्वित्यभिऽसंविशन्तु। तया। देवतया। अङ्गिरस्वत्। ध्रुवेऽइति ध्रुवे। सीदतम्॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहाश्रमी मनुष्य म्हणत आहे) (मम) माझे वा मी (ज्यैष्ठाय) ज्येष्ठ साक्षात केलेले आचरण आहे. (तसेच या महिन्यात माझ्या श्रेष्ठत्वासाठी (अमे:) उष्णतेचे कारण अग्नि त्याद्वारे (अन:श्‍लेष:) उत्पन्न होणाऱ्या विविध प्रकारच्या वायूंचा माझ्याशी संबंध (असि) येतो (ज्येष्ठ महिन्यात करण्यास आवश्‍यक कामें आणि निसर्गातील उष्ण, अती उष्ण असे होणारे परिवर्तन आहेत, (त्यांचे मी सुख वा लाभ अनुभवतो) (ज्येष्ठ मासाच्या आधी येणारा) (मधु:) मधुर सुगंधिमय चैत्र महिना (च) आणि (माधव:) माधुर्य आदी गुणांना उत्पन्न करणारा वैशाख महिना (च) आणि या महिन्यांशी संबंधित (निसर्गातील सर्व पदार्थ) (वासंतिकौ) तसेच या वसंत ऋतूत उत्पन्न होणारी (ऋतू) सर्वांना सुखदायक सर्व साधनें सुखकारी (कलोताम्‌) व्हावीत (वसंत ऋतू, त्यात होणारे मधुर फळ, फुलें हे सर्व माझ्यासाठी आनंददायक व्हावेत, अशी माझी इच्छा आहे) या चैत्र आणि वैशाख महिन्यात (द्यावा पृथिवी सूर्य आणि भूमी तसेच (आप:) जनदेखील उपभोग गेण्यासाठी (कल्पन्ताम्‌) आनंददायक व्हावे. (पृथक्‌) भिन्न-भिन्नता विविध प्रकारच्या (ओषधय:) यव आणि सोम लला आदी औषधी तसेच (अग्नय:) विद्युत आदी अग्नी (वा वसंत ऋतूत माझ्यासाठी) (कल्पन्ताम्‌) कार्यसाधक होवो. हे (सव्रता:) सत्यभाषण, सत्याचरण आदी व्रतांचे पालन करणाऱ्या (समनस:) ज्ञानी व चिंतनशाल (देवा:) विद्वज्जन हो, (ये) जी माणसें (वासन्तिकौ) (ऋतू) वसंतऋतूच्या चैत्र-वैशाख मासांत आहेत, (त्या ऋतूचे सुख अनुभवीत आहेत) अथवा (ये) जे (अन्तरा) या ऋतूत होणारे (अग्नय:) अग्नीचे विविध प्रकार आहेत, त्या लोकांना (अभिकल्पमाना) आपण अग्नीचे विविध प्रकारांचा उपयोग करण्याचे ज्ञान शिकवा ज्यायोगे (इन्द्रमिव) त्या लोकांना ऐश्‍वर्य प्राप्ती होईल, अशा पद्धतीने आपण लोकांना (अभिसंविशन्तु) सर्वप्रकारे सहकार्य करा. ज्याप्रमाणे (इमे) हे (द्यावापृथिनी) सूर्य आणि पृथ्वी (तया) त्या (देवत्या) पूरमपूज्य परमेश्‍वराच्या सामर्थ्यामुळे (अ---स्वत्‌) सर्व प्राणीमात्राचे प्राणसमान आहेत आणि सर्वांच्या (ध्रुवे) कल्याणाकरिता सदा कार्यरत असतात, त्याप्रमाणे तुम्ही दोघे पति-पत्नीदेखील (या वसंत ऋतूत सर्वांच्या कल्याणासाठी (सीदतम्‌) झटत रहा ॥25॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, तुम्हांस उचित आहे की ज्या वसंत ऋतूत वृक्ष-जवादी फळ-पुष्पांनी बहरलेली असतात, आणि ज्यामध्ये प्रकाश तीव्र, पृथ्वी रुक्ष, जल मध्यम आणि औषधी वृक्ष-वनस्पती आदी फळ-फुलांनी समृद्ध असतात आणि अग्नीच्या ज्वाला (वा उष्णता) तीव्र असते, त्या ऋतूचे उचितप्रकारे सेवन करा आणि त्याद्वारे पुरुषार्थ करीत (ऋतूच्या आनंदाचा) उपभोग घ्या. ज्याप्रमाणे विद्वान वा शहाणी माणसे यथोचित यथाविधी प्रयत्न करून सर्व ऋतूंमध्ये आपली सुख-संपत्ती वाढवतात, त्याप्रमाणे, हे मनुष्यांनो, तुम्ही देखील तसे करा ॥25॥
Subject
पुढील मंत्रात वसंत ऋतूचे वर्णन केले आहे -