Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 22

58 Mantra
13/22
Devata- अग्निर्देवता Rishi- इन्द्राग्नी ऋषी Chhand- भुरिगनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यास्ते॑ऽ अग्ने॒ सूर्य्ये॒ रुचो॒ दिव॑मात॒न्वन्ति॑ र॒श्मिभिः॑। ताभि॑र्नोऽ अ॒द्य सर्वा॑भी रु॒चे जना॑य नस्कृधि॥२२॥

याः। ते॒। अ॒ग्ने॒। सूर्ये॑। रुचः॑। दिव॑म्। आ॒त॒न्वन्तीत्या॑ऽत॒न्वन्ति॑। र॒श्मिभि॒रिति॑ र॒श्मिऽभिः॑। ताभिः॑। नः॒। अ॒द्य। सर्वा॑भिः। रु॒चे। जना॑य। नः॒। कृ॒धि॒ ॥२२ ॥

Mantra without Swara
यास्तेश्अग्ने सूर्ये रुचो दिवमातन्वन्ति रश्मिभिः । ताभिर्ना अद्य सर्वाभी रुचे जनाय नस्कृधि ॥

याः। ते। अग्ने। सूर्ये। रुचः। दिवम्। आतन्वन्तीत्याऽतन्वन्ति। रश्मिभिरिति रश्मिऽभिः। ताभिः। नः। अद्य। सर्वाभिः। रुचे। जनाय। नः। कृधि॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्विनी विदुषी अध्यापिके, (या:) जी (ते) तुझी रुची वा आवड आहे (ज्या वस्तू तुला प्रिय आणि हितकर वाटतात) (ताभि:) त्या (सर्वाभि:) सर्व प्रिय वस्तूंनी (न:) आम्हास (सुखाकर, आनंदित कर) जसे (रुच:) दीप्ती वा ज्योती (सूर्य्ये) सूर्याच्या (रश्‍मिभि:) किरणांनी (दिवम्‌) प्रकाशाचा (आतन्वति) विस्तार करतात. (आकाशाला प्रकाशित करतात, त्याप्रमाणे हे विदुषी, तू देखील (आम्हाला विज्ञानाद्वारे) सुखी कर (आमची बुद्धी तीव्र कर) आणि (अद्य) आज (रूचे) प्रीतीभावाची कामना करणाऱ्या (जनाय) प्रतिष्ठित मनुष्यांसाठी आणि (न:) आम्हासाठी प्रीतीभावाचा विस्तार कर (सर्वांना ज्ञान प्रदान करून आनंदित कर) ॥22॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सूर्याची दीप्ती ब्रह्मांडातील सर्व पदार्थांना प्रकाशित करते आणि सर्वांना आनंद देते, तद्वत विदुषी पतिव्रता स्त्रिया व गृहकार्यांविषयी आनंद निर्माण करतात. ज्या कुळात स्त्री आणि पुरुष एकमेकाशी प्रेमाने वागतात, त्या ठिकाणीं सर्व बाबतीत कल्याणच होते ॥22॥
Subject
पुढील मंत्रात, ‘स्त्री कशी असावी’, याविषयी प्रतिपादन केले आहे-