Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 21

58 Mantra
13/21
Devata- पत्नी देवता Rishi- अग्निर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
या श॒तेन॑ प्रत॒नोषि॑ स॒हस्रे॑ण वि॒रोह॑सि। तस्या॑स्ते देवीष्टके वि॒धेम॑ ह॒विषा॑ व॒यम्॥२१॥

या। श॒तेन॑। प्र॒त॒नोषीति॑ प्रऽत॒नोषि॑। स॒हस्रे॑ण। वि॒रोह॒सीति॑ वि॒ऽरोह॑सि। तस्याः॑। ते॒। दे॒वि॒। इ॒ष्ट॒के॒। वि॒धेम॑। ह॒विषा॑। व॒यम् ॥२१ ॥

Mantra without Swara
या शतेन प्रतनोषि सहस्रेण विरोहसि । तस्यास्ते देवीष्टके विधेम हविषा वयम् ॥

या। शतेन। प्रतनोषीति प्रऽतनोषि। सहस्रेण। विरोहसीति विऽरोहसि। तस्याः। ते। देवि। इष्टके। विधेम। हविषा। वयम्॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (इष्टके) विटेप्रमाणे दृढ अंगें असलेल्या आणि शुभगुणवती हे (देवि) दीप्तिमान स्त्री, ज्याप्रमाणे शेकडो वा हजारोंच्या संस्थेत असलेली वीट घराचा विस्तार करते वा निर्माण करते, त्याप्रमाणे (तू अशी आहेस की) (या) जी आम्हा गृहाश्रमीक पतिगणांसाठी (रातेन) शेकडो पुत्र, पीत्र आदी व संपत्तीचा (प्रतनोषि) विस्तार करतेस (स्त्रीमुळेच पुत्र, पौत्र, प्रपौत्र आदी रुपाने वंशाचा विस्तार होतो) तसेच हे स्त्रीत तू (सहस्रेण) हजार प्रकारच्या पदार्थांनी (विरोहसि) ग्रहाला विविधप्रकारे वाढवतेस. (तस्या:) अशा गुणवती असलेल्या (ते) तुझी (वयम्‌) आम्ही (पतिगण) (हृविषा) भेट देण्यास योग्य वा गृहाश्रमासाठी आवश्‍यक पदार्थांद्वारे (विधेम) सेवा करतो. (तुझा सहकार्य देतो व तुझी स्तुती करतो. ॥21॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपना अलंकार आहे. जसे शंभर, हजार म्हणजे अधिक विटांनी तयार झालेले घर सर्व लोकांना सुख-सोय देते, तद्वत श्रेष्ठ स्त्रियांनी घराला (वंशाला) पुत्र, पौत्र, ऐश्‍वर्य, सेवक आदींद्वारे घरातील सर्वांना प्रथम ठेवावे. घरातील पुरुषांनी (पतींनी) अशा स्त्रियांना नेहमी सत्कार-सम्मान करावा, कारण की श्रेष्ठ पुरुष आणि स्त्रियांच्या संग-सहकार्याविना शुभगुणवान संतती उत्पन्न होणे कदापि शक्य नाही आणि गुणवान संतती असल्याशिवाय आई-वडिलांनादेखील सुख मिळणे कधीतरी शक्य आहे का? ॥21॥
Subject
स्त्री कशी असावी, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -