Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 15

58 Mantra
13/15
Devata- अग्निर्देवता Rishi- त्रिशिरा ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
भुवो॑ य॒ज्ञस्य॒ रज॑सश्च ने॒ता यत्रा॑ नि॒युद्भिः॒ सच॑से शि॒वाभिः॑। दि॒वि मू॒र्द्धानं॑ दधिषे स्व॒र्षां जि॒ह्वाम॑ग्ने चकृषे हव्य॒वाह॑म्॥१५॥

भुवः॑। य॒ज्ञस्य॑। रज॑सः। च॒। ने॒ता। यत्र॑। नि॒युद्भि॒रिति॑ नि॒युत्ऽभिः॑। सच॑से। शि॒वाभिः॑। दि॒वि। मू॒र्द्धान॑म्। द॒धि॒षे॒। स्व॒र्षाम्। स्वः॒सामिति॑ स्वः॒ऽसाम्। जि॒ह्वाम्। अ॒ग्ने॒। च॒कृ॒षे॒। ह॒व्य॒वाह॒मिति॑ हव्य॒ऽवाह॑म् ॥१५ ॥

Mantra without Swara
भुवो यज्ञस्य रजसश्च नेता यत्रा नियुद्भिः सचसे शिवाभिः । दिवि मूर्धानन्दधिषे स्वर्षाञ्जिह्वामग्ने चक्रिषे हव्यवाहम् ॥

भुवः। यज्ञस्य। रजसः। च। नेता। यत्र। नियुद्भिरिति नियुत्ऽभिः। सचसे। शिवाभिः। दिवि। मूर्द्धानम्। दधिषे। स्वर्षाम्। स्वःसामिति स्वःऽसाम्। जिह्वाम्। अग्ने। चकृषे। हव्यवाहमिति हव्यऽवाहम्॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान (राजा वा राजपुरुष), (यत्र) ज्या राज्यात आपणासारखा (नियुद्भि:) वायूच्या वेगाप्रमाणे शीघ्र कार्य करणारा, (रजस:) लोक (समाज) अथवा ऐश्‍वर्याचा (नेता) मार्गदर्शक असणारा आणि (दिवि) न्यायाचा प्रकाश (वा न्याय्यवृत्ती) (मूद्धनिम्‌) मस्तिष्कामधे धारण करणारा (गतिशील, मार्गदर्शक व त्याचा विचार असलेला) राजा असते, (तिथे सर्वप्रकारे सुख नांदते). तसेच (यंत्र) ज्या राज्यात (शिवाभि:) कल्याणकारी नीतीचा अंमल असून (भुव:) आपल्या भूमीचे पालन (यज्ञस्य) राजधर्माप्रमाणे (सचसे) होत असते जिथे श्रेष्ठ पुरुष राज्य (दधिषे) धारण करतात (वा राज्य चालवितात) तसेच (हव्यवाहनम्‌) जिथे विद्वानांना आवश्‍यक वस्तू आणि (स्वर्पाभू) सुखसोयी देणारी (व्यवस्था आहे) चांगले बोलणारी वाणी (आदर-सम्मानाची वागणूक) (चकृषे) बोलली व केली जातो, (त्या आपल्या अशा या राज्यात) सुख आणि आनंदाची वर्षा का होऊ नये! (अर्थात अवश्‍य होते) ॥15॥
Essence
भावार्थ - ज्या राज्यात राजा आणि राजपुरुष मंगलमय आचरण करणारे, धर्मात्मा असून धर्माप्रमाणे प्रजेचे पालन करणारे असतील तिथे विद्या आणि उत्तम शिक्षणादीमुळे उत्पन्न होणारे सुख का वाढू नये? (अर्थात त्या राज्यात सुख आणि आनंद अवश्‍य नांदणार.) ॥15॥
Subject
पुनश्‍च, तो राजपुरूष कसा असावा, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -