Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 14

58 Mantra
13/14
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- भुरिगनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒ग्निर्मू॒र्द्धा दि॒वः क॒कुत्पतिः॑ पृथि॒व्याऽ अ॒यम्। अ॒पा रेता॑सि जिन्वति। इन्द्र॑स्य॒ त्वौज॑सा सादयामि॥१४॥

अ॒ग्निः। मू॒र्द्धा। दि॒वः। क॒कुत्। पतिः॑। पृ॒थि॒व्याः। अ॒यम्। अ॒पाम्। रेता॑सि। जि॒न्व॒ति॒। इन्द्र॑स्य। त्वा॒। ओज॑सा। सा॒द॒या॒मि॒ ॥१४ ॥

Mantra without Swara
अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम् । अपाँ रेताँसि जिन्वति । इन्द्रस्य त्वौजसा सादयामि ॥

अग्निः। मूर्द्धा। दिवः। ककुत्। पतिः। पृथिव्याः। अयम्। अपाम्। रेतासि। जिन्वति। इन्द्रस्य। त्वा। ओजसा। सादयामि॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक सभासद वा आचार्य राजाला उद्देशून म्हणत आहे) हे राजा, ज्याप्रमाणे (अयम्‌) हा (अग्नि:) सूर्य (दिव:) आकाशामध्ये (प्रकाशित होत आहे) आणि जसे (पृथिव्या:) हा सूर्य पृथ्वीच्या (मूर्द्धा) व सर्व प्राण्यांसाठी (मूर्द्धा) शिर ना मस्तकाप्रमाणे उत्तम आहे, (ककुत्‌) सर्वांहून महान असून (पति) सर्व पदार्थांचा रक्षक आहे तसेच हा सूर्य (अपाम्‌) जलाचे (वीर्याणि) सार देऊन सर्व प्राण्यांना (जिन्वति) तृप्त करतो, त्याप्रमाणे आपणही (प्रजाजनांना) तृप्त व समाधानी करा. मी (एक सभासद वा आचार्य) (इन्द्रस्य) सूर्या (ओजसा) व सारखा प्रताप आणि प्रभाव निर्माण करण्यासाठीच्या हेतूने आपणास या राज्याकरिता (सादयामि) नियुक्त करीत आहेत ॥14॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जो माणूस सूर्याप्रमाणे गुण, कर्म आणि स्वभाव असलेला, न्यायाने प्रजेचे पालन करणारा, धर्मात्मा आणि विद्वान असेल, त्यालाच (राज्यातील) सर्व लोकांनी राज्याधिकारी (राजा) म्हणून मानावे (अशा मनुष्यास निवडून द्यावे) ॥14॥
Subject
राजपुरुष कसा असावा, पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -