Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 11

58 Mantra
13/11
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
प्रति॒ स्पशो॒ विसृ॑ज॒ तूर्णि॑तमो॒ भवा॑ पा॒युर्वि॒शोऽ अ॒स्या अद॑ब्धः। यो नो॑ दू॒रेऽ अ॒घश॑ꣳसो॒ योऽ अन्त्यग्ने॒ माकि॑ष्टे॒ व्यथि॒राद॑धर्षीत्॥११॥

प्रति॑। स्पशः॑। वि। सृ॒ज॒। तूर्णि॑तम॒ इति॒ तूर्णि॑ऽतमः। भव॑। पा॒युः। वि॒शः। अ॒स्याः। अद॑ब्धः। यः। नः॒। दू॒रे। अ॒घश॑ꣳस॒ इत्य॒घऽश॑ꣳसः। यः। अन्ति॑। अग्ने॑। माकिः॑। ते॒। व्यथिः॑। आ। द॒ध॒र्षी॒त् ॥११ ॥

Mantra without Swara
प्रति स्पशो विसृज तूर्णितमो भवा पायुर्विशो अस्याऽअदब्धः । योनो दूरेऽअघशँसो योऽअन्त्यग्ने माकिष्टे व्यथिरादधर्षीत् ॥

प्रति। स्पशः। वि। सृज। तूर्णितम इति तूर्णिऽतमः। भव। पायुः। विशः। अस्याः। अदब्धः। यः। नः। दूरे। अघशꣳस इत्यघऽशꣳसः। यः। अन्ति। अग्ने। माकिः। ते। व्यथिः। आ। दधर्षीत्॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन सेनापतीस उद्देशून म्हणत आहेत) (अग्ने) अग्नी जसा वस्तूंना, तसे शत्रूंना जाळणारे हे सेनापती, (ते) तुम्हाला आत्रण (न:) आम्हाला (य:) जो (व्यथि:) न्यथित करणारा आणि (अघशंस:) पापकर्माकडे प्रवृत्त करणारा शत्रू आहेत, तो (दूरे दूर) असोत वा (य:) जो (अन्ति) निकट असो, तो कुमार्गी अहितकारी दुष्ट आम्हाला (माकि:) (आ) (दधर्षीत्‌) दु:ख देऊ शकणार नाही, असे करा (त्यास दूर ठेवा वा मारा) तसेच त्या शत्रू (प्रति) विषयी आपण (तूर्णितम:) शीघ्र दंड देणारे व्हा आणि त्यासाठी (स्पश:) विविध बंधने करा (अनेकप्रकारे त्यास काबूत आणा) अशाप्रकारे विविध बंधने करा (अनेकप्रकारे त्यास काबूत आणा) अशाप्रकारे (अस्था:) या विद्यमान (विश:) प्रजेचे (पायु:) रक्षक व्हा आणि आम्हांस (अदब्ध:) हिंसा वा कष्ट न देणारे (भव) व्हा ॥11॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. प्रजाजनांना व्यथित पीडित करणारे जे जवळ राहणारे अथवा दूर राहणारे लुटारू, दरोडेखोर आहेत (वा असतात) राजा आदी राजपुरुषांनी अशा दुष्टांना साम, दाम, दंड आणि भेद या उपायांद्वारे शीघ्र काबूत आणावे आणि अशाप्रकारे दया व न्यायपूर्ण आचरणाद्वारे धार्मिक प्रजाजनांचे निरंतर रक्षण करावे. ॥11॥
Subject
पुनश्‍च, सेनापती कसा असावा, याविषयी पुढील मंत्रात वर्णन केले आहे -