Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 10

58 Mantra
13/10
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- भुरिक् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
तव॑ भ्र॒मास॑ऽ आशु॒या प॑त॒न्त्यनु॑ स्पृश धृष॒ता शोशु॑चानः। तपू॑ष्यग्ने जु॒ह्वाड्ट पत॒ङ्गानस॑न्दितो॒ विसृ॑ज॒ विष्व॑गु॒ल्काः॥१०॥

तव॑। भ्र॒मासः॑। आ॒शु॒येत्या॑शु॒या। प॒त॒न्ति॒। अनु॑। स्पृ॒श॒। धृ॒ष॒ता। शोशु॑चानः। तपू॑षि। अ॒ग्ने॒। जु॒ह्वा᳖। प॒त॒ङ्गान्। अस॑न्दित॒ इत्यस॑म्ऽदितः। वि। सृ॒ज॒। विष्व॑क्। उ॒ल्काः ॥१० ॥

Mantra without Swara
तव भ्रमास आशुया पतन्त्यनु स्पृश धृषता शोशुचानः । तपूँष्यग्ने जुह्वा पतङ्गानसन्दितो विसृज विष्वगुल्काः ॥

तव। भ्रमासः। आशुयेत्याशुया। पतन्ति। अनु। स्पृश। धृषता। शोशुचानः। तपूषि। अग्ने। जुह्वाड्ट। पतङ्गान्। असन्दित इत्यसम्ऽदितः। वि। सृज। विष्वक्। उल्काः॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेले सेनापती, आपण (शोशुचान:) अत्यंत पवित्र आचरण करणारे आहात. (आम्ही प्रजाजन आपणाकडून अपेक्षणा करतो की राज्यरक्षणासाठी) (तव) आपल्या (भ्रमास:) शीघ्र गतीने हालचाल करणाऱ्या वीर सैनिकांनी (विष्वक्‌) सर्वदिशांनी (आशुया) शीघ्रगतिशील (उल्का:) विजेप्रमाणे हालचाल करून (शत्रुसैन्येवर झटपट तूटून पडावे) आणि (पतन्ति) बहिरीससाणा पक्षी ज्याप्रमाणे (पक्ष्यांवर अपाटा मारतो) तद्वत (पठन्ति) शत्रुसैन्येला पकडावे. आपण त्या वीर दृढ सैनिकांना (अनु) (स्पृश) अनुकूल व्हा. (सैनिकांना मार्गदर्शन करो त्यांचे नेतृत्व सैनिकांना (अनु) (स्पृश) अनुकूल व्हा (सैनिकांना मार्गदर्शन करा त्यांचे नेतृत्व करा) अशा प्रकारे (असद्वित:) अखंडित वा अपराजित राहून (जुह्वा) हवन केलेल्या घृताहुतीने प्रज्वलित होणाऱ्या ज्वाळेच्या (तपूंषि) तेजाप्रमाणे शत्रुसैन्यावर सर्वदिशांनी विद्युत-(विसृज) प्रहार करा आणि (पतड्मन्‌) घोड्यांना प्रशिक्षित करून उत्तम घोडदळ तयार करा ॥10॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सेनापती आणि सैन्यातील सेवक, कर्मचारी आदी यांना पाहिजे की त्यांनी आपसात स्नेह व सहकार्य असू द्यावे. शक्ति वृद्धी करीत वीर सैनिकांना प्रसन्न ठेवावे. युद्धात सम्यकप्रकारे आग्नेय अस्त्रांनी आणि भुसंडी (तोफ बंदूक) आदी अस्त्रांनी शत्रुसैन्यावर विद्युत वर्षा व अग्नीवर्षा करावी की ज्योयोगे विजय शीघ्र प्राप्त होईल ॥10॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात तोच विषय (सेनापतीने काय करावे?) वर्णित आहे-