Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 13 / Mantra 1

58 Mantra
13/1
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सार ऋषिः Chhand- आर्ची पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
मयि॑ गृह्णा॒म्यग्रे॑ अ॒ग्निꣳ रा॒यस्पोषा॑य सुप्रजा॒स्त्वाय॑ सु॒वीर्या॑य। मामु॑ दे॒वताः॑ सचन्ताम्॥१॥

मयि॑। गृ॒ह्णा॒मि॒। अग्रे॑। अ॒ग्निम्। रा॒यः। पोषा॑य। सु॒प्र॒जा॒स्त्वायेति॑ सुप्रजाः॒ऽत्वाय॑। सु॒वीर्य्या॒येति॑ सु॒ऽवीर्य्या॑य। माम्। उ॒ इत्यूँ॑। दे॒वताः॑। स॒च॒न्ता॒म् ॥१ ॥

Mantra without Swara
मयि गृह्णाम्यग्रे अग्निँ रायस्पोषाय सुप्रजास्त्वाय सुवीर्याय । मामु देवताः सचन्ताम् ॥

मयि। गृह्णामि। अग्रे। अग्निम्। रायः। पोषाय। सुप्रजास्त्वायेति सुप्रजाःऽत्वाय। सुवीर्य्यायेति सुऽवीर्य्याय। माम्। उ इत्यूँ। देवताः। सचन्ताम्॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक विद्वान बालक-बालिका वा कुमार-कुमारींना म्हणत आहे) हे कुमार मुलांनो अथवा कुमारी मुलींनो ज्याप्रमाणे मी (अग्ने) आधी (तुमच्यापूर्वी) (मयि) स्वत:च्या कल्याणाकरिता (राय:) तसेच विज्ञान आदी धनाच्या (पोषाय) प्राप्ती व वृद्धीसाठी आणि (सप्रजास्त्वाय) उत्तम संतान उत्पन्न होण्यासाठी एका विद्वानाला निवडले आहे) शिवाय (सुवीर्य्याय) नीरोग राहण्यासाठी आणि पराक्रमी होण्यासाठी (अग्निम्‌) त्या उत्तम विद्वानाला (गृह्णामि) निवडले आहे. (त्याच्याकडून शिक्षण घेत आहे) की ज्यामुळे (माम्‌) मला (उ) निश्‍चयाने (देवता:) उत्तम गुणांची (सचन्ताम्‌) प्राप्ती होईल, त्याप्रमाणे तुम्ही देखील करा (वरील हेतूंसाठी तुम्ही देखील योग्य विद्वान गुरु निवडा) ॥1॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांकरिता हे उचित आहे की त्यांनी कुमारवयात ब्रह्मचर्य-पालन करून वेदादी शास्त्रांचे अध्यमन करावे, पदार्थविद्या शिकून उत्तम कर्म करीत ईश्‍वराची उपासना करावी आणि ब्रह्मज्ञानी व्हावे. त्यामुळे त्यांना श्रेष्ठ गुण आणि आप्त विद्वान मिळतील आणि पुढे (विवाहानंतर उत्तम संतान, ऐश्‍वर्य आणि पराक्रम यांची प्राप्ती होईल ॥1॥
Subject
आता तेराव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात सांगितले आहे की मनुष्यांनी प्रथम अवस्थेत (ब्रह्मचर्य-आश्रमात) काय केले पाहिजे-