Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 99

117 Mantra
12/99
Devata- ओषधिर्देवता Rishi- वरुण ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सह॑स्व मे॒ऽअरा॑तीः॒ सह॑स्व पृतनाय॒तः। सह॑स्व॒ सर्वं॑ पा॒प्मान॒ꣳ सह॑मानास्योषधे॥९९॥

सह॑स्व। मे॒। अरा॑तीः। सह॑स्व। पृ॒त॒ना॒य॒त इति॑ पृतनाऽय॒तः। सह॑स्व। सर्व॑म्। पा॒प्मान॑म्। सह॑माना। अ॒सि॒। ओ॒ष॒धे॒ ॥९९ ॥

Mantra without Swara
सहस्व मे अरातीः सहस्व पृतनायतः । सहस्व सर्वम्पाप्मानँ सहमानास्योषधे ॥

सहस्व। मे। अरातीः। सहस्व। पृतनायत इति पृतनाऽयतः। सहस्व। सर्वम्। पाप्मानम्। सहमाना। असि। ओषधे॥९९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (ओषधे) औषधीप्रमाणेच लाभ देणाऱ्या (उपकारक) आणि औषधी विद्या जाणणाऱ्या हे वैद्य स्त्री, हे औषध (सहमाना) वलदायिके शक्तिवर्धक (असि) आहे आणि (मे) माझ्यातील रोगांचे निवारण करून माझे बळ वाढविते. त्याचप्रमाणे (या औषधीमुळे माझे बळ इतके वाढावे की) त्याद्वारे तू (असती:) माझ्या शत्रूंना (सहस्व) वशीभूत कर-(प्रतनायत:) जे शत्रू सैन्य घेऊन माझ्याशी युद्ध करण्यासाठी येतील, (त्यांना मी पराजित करू शकेन) एवढी (सहस्व) शक्ती वाढव आणि (सर्वम्‌) सर्व (पामानम्‌) रोग आदी क्लेशकारी शत्रूंना (मी सहन करू शकेन, त्यांचा सामना करू शकेन) एवढी (सहस्व) शक्ती मला दे. ॥99॥
Essence
भावार्थ - सर्व मनुष्यांकरिता योग्य आहे की त्यांनी औषध सेवन करून आपले बळ वाढवावे. संततीच्या आणि आपल्या शत्रूंना तसेच पापीजनांना वश करून सर्व (सज्जन, सदाचारी जनांना) सुखी करावे ॥99॥
Subject
मनुष्यांनी कोणत्या रीतीने काय काय करावे, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -